(फोटो सौजन्य - x अकाउंट)
जगभरातील लोकप्रिय शो ‘स्क्विड गेम’ने त्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सीझनसह पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. २७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या सीझनने फक्त तीन दिवसांत अशी कामगिरी केली आहे जी आतापर्यंत इतर कोणत्याही शोला करता आली नाही. ‘स्क्विड गेम सीझन ३’ ने नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला शो बनण्याचा एक नवा विक्रम रचला आहे. ‘स्क्विड गेम सीझन ३’ लोकांना वेडे केले आहे. तसेच नेटफ्लिक्सचा हा नवा रेकॉर्ड बनला आहे.
९३ देशांमध्ये नंबर १ शो बनला
रिलीज झाल्यापासून फक्त ७२ तासांतच, हा सीझन ९३ देशांमध्ये नंबर १ शो बनला. नेटफ्लिक्सच्या अधिकृत प्लॅटफॉर्म टुडमनुसार, सीझन ३ पहिल्या तीन दिवसांत ६०.१ दशलक्ष वेळा पाहिला गेला जो या कालावधीतील कोणत्याही शोसाठी सर्वाधिक आहे. इतकेच नाही तर या विक्रमासह, स्क्विड गेम हा पहिल्या आठवड्यात नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक लोकप्रिय शोमध्ये समाविष्ट होणारा पहिला शो देखील बनला आहे.
‘पारू’ फेम अभिनेत्याचे ‘त्या’ व्हिडिओवर स्पष्टीकरण; म्हणाला, “मी फक्त ‘पारू’ मालिकेबद्दल…”
वेब सिरीजची थ्रिलर कथा
तिसऱ्या सीझनची कथा दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या ठिकाणापासून पुढे सरकते. मुख्य पात्र गी-हुन अजूनही हार मानण्यास तयार नाही. यावेळी त्याला केवळ त्याच्या आयुष्यालाच नव्हे तर उर्वरित खेळाडूंच्या भवितव्यालाही दिशा द्यावी लागते. खेळ अधिक धोकादायक बनला आहे आणि प्रत्येक पावलावर जीवाला धोका वाढत आहे. प्रेक्षकांना ही सिरीज खूपच आवडली आहे.
चाहत्यांना खरा स्क्विड गेम अनुभव मिळाला
रिलीज होण्यापूर्वी, नेटफ्लिक्सने सीझन ३ च्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. विशेषतः दक्षिण कोरियातील सोलमध्ये झालेल्या एका मेगा इव्हेंटमध्ये ३८,००० हून अधिक चाहत्यांनी भाग घेतला. या परेडमध्ये, संपूर्ण शहर गुलाबी गार्ड आणि शोच्या प्रसिद्ध पात्रांसह स्क्विड गेमच्या जगात रूपांतरित झाले. या कार्यक्रमाने चाहत्यांना खरा अनुभव घेण्याची संधी दिली, ज्यामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला.
‘बिग बॉस’ फेम प्रसिद्ध कपल लवकरच करणार लग्न, कॉमेडियन कृष्णा अभिषेकने केली पुष्टी?
नवीन इतिहास रचला
स्क्विड गेमच्या तिसऱ्या सीझनच्या या अभूतपूर्व यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले की हा शो केवळ मनोरंजनासाठी नाही तर एक जागतिक घटना बनला आहे. निर्माते ह्वांग डोंग-ह्युकची ही कल्पनाशक्ती आतापर्यंत कोट्यवधी लोकांच्या विचारांशी आणि भावनांशी जोडलेली आहे.