'त्या' एका चुकीमुळे गोविंदाच्या करिअरला लागली उतरती कळा ? आजही होतोय पश्चाताप
एकेकाळचा ‘बॉलिवूडचा नंबर १ हिरो’ म्हणून अभिनेता गोविंदाला ओळखला जातो. आपल्या डान्स, कॉमेडी आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गोविंदाचा आद ६१ वा वाढदिवस आहे. गोविंदाने आपल्या विनोदी अभिनय तसेच चित्रपटांमधील नृत्यातून प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. . विविध चित्रपटांत नंबर वन बनत अभिनेत्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तर कधी संवेदनशील भूमिका साकारत रसिकांना रडवलंही तर कधी कधी रोमँटिक अंदाजात त्याने साऱ्यांची मनं जिंकली. गोविंदाच्या कोणत्या एका चुकीमुळे त्याच्या करिअरला उतरती कळा लागली, हे आज आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया…
‘कलर्स मराठी’वर येत्या सोमवारी रंगणार ‘या’ ६ मालिकांचा विशेष भाग, कोणकोणत्या मालिकांचा आहे समावेश
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने मुलाखतीतून हा खुलासा केला आहे. नेपोटिझम अर्थात घराणेशाही… बॉलिवूड इंडस्ट्री म्हटल्यावर आपसुकच नेपोटिझम येतंच. अनेक सेलिब्रिटींप्रमाणे गोविंदालाही नेपोटिझमचा फटका बसला होता. त्याने एका मुलाखतीतून त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात वाचा फोडली होती. गोविंदाने आपल्या करियरच्या काळात स्वतःच्या नियमांवर काम केले आणि त्याच ताकदीवर त्याने यश मिळवले. इतके सुपरडुपरहिट चित्रपट देणारा गोविंदाचे दर्शन मात्र सिनेमात घडत नाहीत. प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न, गोविंदाने एकदा त्याचे उत्तर दिले होते. त्याने घराणेशाहीला दोष दिला नाही तर बॉलिवूडमधील अनेक शक्ती केंद्रांबद्दल बोलले.
राधिका आपटेला आई व्हायचं नव्हतं, तरीही राहिली प्रेग्नेंट; स्वत:च केला खुलासा
गोविंदाने सांगितले की, जर तो ही एखाद्या मोठ्या ग्रुपसोबत संबंधित असला असता तर त्यालाही चांगले सिनेमे मिळाले असते. त्यामुळे त्याच्या करिअरला फार मोठे नुकसान झाले आहे. तो एखाद्या मोठ्या घराण्याशी किंवा ग्रुपसोबत जोडला गेला असता तर कदाचित त्याला अनेक चांगले चित्रपटही मिळाले असते. बॉलिवूड एक मोठे कुटुंबसारखे आहे. सगळ्यांनुसार आपण वागले तर तुम्ही सर्वांसाठी चांगले बनता. तुम्हाला कामही मिळतात. इंडस्ट्रीत डेविड धवनसोबत गोविंदाचा रंगलेला वाद साऱ्यांनाच माहिती आहे. गोविंदाने डेव्हिड धवन यांच्या विविध सिनेमात काम केले आहे. मात्र आता त्याच दिग्दर्शकासोबत काम करण्यास गोविंदा तयार नाही. जसे काम इतर अभिनेत्यांना मिळते तसे काम गोविंदाला आता मिळत नाही.
“झुकेगा नहीं साला…” कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारने सल्लागार समिती नेमल्याने दिलजीत दोसांझची नाराजी
गोविंदाने डेव्हिड धवनसोबत ‘शोला और शबनम’, ‘कुली नंबर 1’, ‘साजन चले ससुराल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण हे सगळं असूनही २००० सालानंतर गोविंदाने तो दर्जा गमावला ज्यासाठी तो ओळखला जात होता. सहकलाकार म्हणून त्याने नक्कीच चांगले काम केले, परंतु त्याची मुख्य अभिनेत्याची प्रतिमा गायब झाली होती.