NASA Plane Crash : लॅंडिग गियर फेल झाले अन्...; नासाच्या विमानाचा भयंकर अपघात; अंगावर काटा आणणार VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२७ जानेवारी २०२६) रोजी नासाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिग करावे लागले. यावेळी ह्यूस्टनच्या एलिंग्टन विमानातळावर हे लँडिग होणार होते. परंतु लँडिग दरम्यान विमान धावपट्टीवरुन कोसळले आणि आगीच्या ज्वाळात रुपांतरित झाले. या अपघातानंतर हवेत आगीच्या ज्वाळा आणि धूर पसरला होता.
या विमानात दोन क्रू मेंबर्स होते. सुदैवाने दोन्ही क्रू मेंबर्स सुखरुप बचावले आहे. त्यांनी वेळे विमानातून बाहेर उडली मारल्यामुळे कोणतीही दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. ह्युस्टन विमानतळाचे एव्हिएशन संचालक जिम स्झ्झेस्नियाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आपत्कालीन सेवा तातडीने घटना स्थळी पोहचल्या आणि आग विझवण्यात आली. तसेच काही काळासाठी धावपट्टी देखील बंद करण्यातआली होती.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, संस्थेचे WB-57 विमानातील तांत्रिक बिघाडामुळे एलिंग्टन विमानतळावर लँडिग करावे लागले होते. यावेळी यावेळी एलिंग्टन विमानतळाने तातडीने प्रतिसाद दिला. परंतु गियर-अप लँडिगवेळी विमान धावपट्टीवरुन घसरले आणि आग लागले. सुदैवाने क्रू मेंबर्सने अपघातापूर्वी बाहेर उडी मारली होती यामुळे त्यांचा जीव सुखरुप बचावा आहे. सध्या या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. याबाबत नासा लवकरच अपडेट देईल असे सागंण्यात आले आहे.
काय आहे WB-57 विमान
WB-57 विमान हे १९७० पासून संशोधन मोहिमांसाठी वापरले जाते. या विमानाची क्षमता ६३ हजार फूट उंचीवर उडण्याची आहे. याची आवृत्तीची तीन निमाने नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरजवळ तैनात करण्यात आली आहेत.
WATCH: NASA plane suffers “mechanical issue,” lands without landing gear at Ellington Field in Houston pic.twitter.com/bJI4UVLPQu — BNO News (@BNONews) January 27, 2026
हवेत गेला तोल अन् Indian Air Force चे प्लेन थेट शहरातील…; प्रयागराजमध्ये घडला भीषण अपघात






