Actor Ranveer Singh Lost His Virginity At The Age Of 12 Had One Night Stands Many Times
बॉलिवूडमधील सर्वात उत्साही आणि कायमच एनर्जेटिक असणाऱ्या सेलिब्रिटीचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंहचा आज ४० वा वाढदिवस आहे. फक्त अभिनयासाठीच नाही तर, आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ही चर्चेत राहिलेला अभिनेता सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी अभिनेत्याने एक मुलाखत दिली होती. ज्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
नाकात नथ अन् केसात गजरा…; सावनी रवींद्रने शेअर केला वारीतला खास क्षण; पारंपारिक लूकने वेधले लक्ष
अभिनेता रणवीर सिंगने प्रत्येकालाच धक्का बसेल, असा धक्कादायक खुलासा मुलाखतीमध्ये केला आहे. अभिनेत्याने सांगितले की, तो नेहमीच खिशात कंडोम ठेवायचा. २०१४ साली अभिनेत्याने डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला की, “मी वयाच्या १२ व्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली आहे. माझ्याकडे खूप मुली यायच्या. मी एका महिलेसोबत सेक्स करून माझी व्हर्जिनिटी गमावली होती. मी नेहमीच खिशात कंडोम घेऊन फिरायचो. फक्त मुलीच नाही तर, मुलंही माझा पाठलाग करायचे आणि मला खूप अश्लिल मेसेजेस पाठवायचे.”
कास्टिंग काउचबद्दल बोलताना रणवीर सिंगने सांगितलेलं की, “मला एकदा एका दिग्दर्शकाची ऑफर देण्यात आली होती, पण मी त्याला नकार दिला. २०१३ मध्ये रणवीरने करण जोहरच्या चॅट शोमध्ये त्याने वन नाईट स्टँड केले असल्याची कबुली दिली. अभिनेत्याने सांगितले की, त्याने एकापेक्षा जास्त वेळा वन नाईट स्टँड केले आहेत. रणवीरच्या मते, शारीरिक संबंध ठेवणे ही एक अतिशय सुंदर आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती अजिबात वाईट किंवा चांगली गोष्ट नाही. मात्र, आता रणवीर सिंग विवाहित आहे आणि त्याचे त्याची पत्नी दीपिका पादुकोणवर खूप प्रेम आहे. त्यांची छान केमिस्ट्री नेहमीच पाहायला मिळते.
“अनाजीपंता, कितीबी आग लाव…” ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर किरण मानेंची पोस्ट
रणवीर सिंगने २०१४ मध्ये एका कंडोम ब्रँडच्या जाहिरातीतही काम केले होते. त्याच्या प्रमोशन दरम्यान रणवीरने असे सांगितले होते की, लोकांनी शारीरिक संबंधांबद्दल उघडपणे बोलले पाहिजे आणि ते वाईट किंवा लपवण्यासारखे काही मानू नये. रणवीर सिंगची ही जुनी मुलाखत त्याची बिनधास्त इमेज आणखी बळकट करते. जिथे तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील पैलूंवरही उघडपणे बोलण्यास मागेपुढे पाहत नाही.