‘या’ गाण्याने बदलले उदित नारायण यांचे नशीब, लहान शहरातील मुलगा कसा झाला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक ?
‘रोमँटिक गाण्यांचे बादशाह’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवणारे लोकप्रिय गायक म्हणजे उदित नारायण यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी ९०च्या दशकातील प्रसिद्ध गायकांमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांचा आवाज आणि त्यांचे गाणे म्हणजेच आज त्यांची ओळख आहे. त्यांनी गायलेल्या गाण्यांना चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. त्यांच्या गाण्यांची आजही एक वेगळीच क्रेझ आहे. पण इथपर्यंतचा उदित यांचा प्रवास काही सोप्पा नव्हता. आज उदित नारायण यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी…
उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी बिहारमधल्या सुपौल येथे झाला. उदित नारायण यांनी हिंदीसह तमिळ, बंगाली, भोजपुरी, मल्याळम अशा अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ६९ वा वाढदिवस साजरा करत असलेल्या उदित नारायण यांनी १९७० च्या दशकात ‘उन्नीस बीस’ चित्रपटाच्या माध्यमातून पार्श्वगायक म्हणून करिअरची सुरुवात केली. उदित नारायण यांनी तेव्हापासून १४० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी इतर भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी अनेक सिंगल आणि ड्युएट अल्बम रेकॉर्ड केले आहेत. त्यांनी 1500 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.
ए.आर.रहमान- सायरा बानोच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम ? खुद्द वकिलांनीच दिली महत्वाची माहिती…
उदित नारायण यांनी आपल्या करिअरची सुरुवात हिंदीमध्ये नव्हे तर, नेपाळी इंडस्ट्रीतून केली होती. त्यांचा पहिला चित्रपट ‘सिंदूर’हा होता. उदित नारायण यांनी नेपाळमधील एका रेडिओ वाहिनीमध्येही काम केले होते. करिअरच्या सुरुवातीला नेपाळी रेडिओमध्ये काम केले होते. त्यांनी रेडिओमध्ये स्टाफ सिंगरची जबाबदारी सांभाळली होती. याच काळात बॉलिवूडमधल्या एका गाण्याने त्यांचं नशीबच पालटलं. तब्बल १० वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर उदित नारायण यांचे पहिले सुपरहिट गाणे प्रदर्शित झाले. आमिर खानच्या ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातील त्यांनी गायलेले ‘पापा कहता है नाम करेगा’ हे गाणं तरुणांच्या गळ्यातले ताईत झाले होते. या एका गाण्याने उदित नारायण यांचे आयुष्य बदलले. या गाण्यासाठी उदित यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
सनी देओल ‘जाट’ मधून खळबळ माजवणार; टीझरची सेन्सॉर प्रक्रिया पूर्ण, रिलीजबाबत मोठे अपडेट आले समोर!
या गाण्याच्या प्रदर्शनानंतर त्यांच्याकडे कामांच्या अनेक ऑफरही येऊ लागल्या होत्या. उदित नारायण यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, त्यांचे दोन लग्न झाले होते. त्यांची पहिली पत्नी रंजना नारायण, तर दुसरी दीपा नारायण होती. उदित रंजनासोबतचे लग्न स्वीकारत नव्हते. जेव्हानंतर त्यांची पहिली पत्नी कोर्टात गेली, तेव्हा त्यांना हे लग्न स्वीकारावे लागले. उदित नारायण यांची दुसरी पत्नी दीपा यांनाही एक मुलगा असून, त्याचे नाव आदित्य नारायण आहे. उदित नारायणप्रमाणे त्यांचा मुलगा आदित्यही बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक-अभिनेता आहे. आदित्यने बॉलिवूडची अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.