ए.आर.रहमान- सायरा बानोच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम ? खुद्द वकिलांनीच दिली महत्वाची माहिती...
ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए.आर.रेहमान आणि सायरा बानो यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला.. लग्नाच्या २९ वर्षानंतर सायरा आणि रेहमान घटस्फोट घेण्याच्या निर्णयामुळ चाहते चिंतेत होते. सायरा बानो यांनीसुद्धा वकील वंदना शाहच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोस्ट लिहित विभक्त होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर घटस्फोटाप्रकरणी पुढे काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आता वकील वंदना शाहने रेहमान आणि सायरा यांच्यात पुन्हा सलोखा होऊ शकतो का आणि त्यांच्या तीन मुलांचा ताबा कोणाला मिळू शकतो, याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
रेहमान आणि सायरा यांना तीन मुलं आहेत. त्यापैकी मुलगी खतिजा रेहमान हिचे लग्न झाले आहे. तर मुलगा एआर अमीन आणि मुलगी रहिमा रेहमानही प्रौढ आहेत. यूट्यूबर विकी ललवानीच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वंदना शाह यांना रेहमान आणि सायरा यांच्या मुलांच्या कस्टडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना वकिल वंदना म्हणाल्या, “मुलांबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाही. अजून निर्णय व्हायचा आहे. त्यांची दोन मुलं प्रौढ आहेत. त्यामुळे त्यांना कोणासोबत राहायचं आहे, हे निवडायचे दोघांनाही कोणतेच बंधनं नाहीत. ते निवडायला त्यांना स्वातंत्र्य आहे.”
शरद कपूरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; शाहरुख खानच्या ‘जोश’ चित्रपटात दिसला होता अभिनेता!
यावेळी वंदना यांना पोटगीबद्दलही सवाल करण्यात आला. रेहमान यांच्याकडून सायरा यांना मोठी पोटगी मिळेल का, असा प्रश्न मुलाखतीदरम्यान वकिलांना विचारण्यात आला होता. त्यावर वकिलांनी उत्तर देणं टाळलं. त्याचप्रमाणे सायरा या पैशांचा विचार करणाऱ्या नाहीत. त्यांच्या लग्नाला २९ वर्षे झाली आहेत, पण सायराबद्दल सार्वजनिकरित्या कोणालाच जास्त माहिती नाही, असं वकिलांनी स्पष्ट केलं. दरम्यान, रेहमान आणि सायरा यांच्यात घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान समझोता होण्याची शक्यता असल्याची माहिती वकिलांनी दिली. मुलाखतीत वकिलांनी सांगितले की, “मी असं म्हणालेले नाही की, समझोता शक्य नाही. मी नेहमी आशावादी राहिली आहे, मी नेहमी प्रेम आणि रोमान्सबद्दल बोलते. ”
आयरा खानने आमिर खान आणि रिना दत्ताच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया
समझोताबद्दल पुढे वकिलांनी सांगितले की, “विभक्त झाल्यानंतर दोघांनी जारी केलेले निवेदनही खूपच स्पष्ट आहे. त्यात विभक्त होण्याबद्दलचं दु:ख व्यक्त केलं गेलंय. त्या निवेदनात दोघेही वेदनांबद्दल बोलले आहेत. रेहमान आणि सायरा यांच्या लग्नाला तब्बल २९ वर्षे लोटली. घटस्फोट घेण्याचा निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी त्यांनी बराच विचार केला. पण मी असं कुठेच म्हटलं नाही की हे दोघं पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत.” ए.आर.रेहमान आणि सायरा बानो यांचे १९९५ मध्ये लग्न झाले. दोघांनीही दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले की, “लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायरा आणि तिचा पती एआर रहमान यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. त्यांच्या नात्यातील भावनिक तणावानंतर हा निर्णय घेण्यात आला. एकमेकांवर त्यांचे नितांत प्रेम असूनही, दोघांनाही असे आढळून आले आहे की तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे जी या दोघांनाही या वेळी पूर्ण करणे कठीण आहे.”