‘बिग बॉस 17’ मध्ये उल्लेखनीय कार्य केल्यानंतर पॉवर कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन सध्या स्ट्रीमिंग रिॲलिटी शो ‘लाफ्टर शेफ’ मध्ये त्यांच कुकिंग कौशल्य दाखवत आहेत. अलीकडे, अंकिता, विकी, तसेच शोच्या निर्मात्यांनी सेटवरील बीटीएस क्षण शेयर केले. एका व्हिडिओमध्ये अंकिता आणि विकी त्यांचे विचार शेअर करत शोसाठी शूट करताना त्यांच्या स्वयंपाक केमिस्ट्रीबद्दल बोलताना दिसत आहे. ‘लाफ्टर शेफ’ च्या सेटवरील आणखी एक BTS व्हिडिओ या जोडप्याने काही पदार्थ बनवताना दाखवले आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये हे दोघे सोशल मीडिया ट्रेंडमध्ये सामील होतात आणि एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी ‘बिग बॉस 17’ मध्ये त्यांच्या अभिनायने प्रेक्षकांच्या मनात कायम घर केल. आणि आता हे दोघे ‘लाफ्टर शेफ’ शोमध्ये त्यांना निर्विवाद केमिस्ट्री असलेले एक परिपूर्ण जोडपे म्हणून प्रेक्षकांना दिसत आहे. सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एकाच हे न पाहिलेल्या अवताराने प्रेक्षकांना दूरचित्रवाणीच्या पडद्यावर खिळवून ठेवले आहे. विनोद आणि करमणुकीच्या उत्तम मिश्रणासह या दोघांनी त्यांच्या स्वयंपाक कौशल्याचे प्रदर्शन केले आहे हे प्रेक्षकांना पाहायला प्रचंड प्रमाणात आवडताना दिसत आहे.
‘बिग बॉस 17’ नंतर, ‘ला पिला दे शराब’ नावाचे गाणे आणि सध्याचा स्ट्रीमिंग शो ‘लाफ्टर शेफ’, अंकिता आणि विकी यांनी त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या समीकरणाने अंकिता-विकीच्या चाहत्यांना कायमच अधिक रुजवले आहे. आता अजून पुढच्या वाटचालीत हे दोन जोडपे नवीन काय घेऊन चाहत्यांच्या भेटीस येतील या सगळ्याची उत्सुकता कायम आहे.