हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पादुकोनच्या (Depika Padukon) बहुचर्चित ‘फाइटर’ चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी रिलिज करण्यात आला. जवानला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा देशभक्तीपर अॅक्शपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात रांगा लावल्या होत्या. ‘फायटर’ने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. चित्रपटानं पहिल्या दिवशी 22.5 कोटीची कमाई केली होती. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईचा आलेख उतरताना दिसत आहे. ‘फायटर’ने मंगळवारी 7.75 कोटींची कमाई केली आहे.
[read_also content=”संगीताचा जादुगार A R Rahman नं AI च्या मदतीनं केली कमाल! दिवंगत गायकांचा आवाज पुन्हा घुमणार कानी, वाचा सविस्तर.. https://www.navarashtra.com/movies/ar-rahman-clarifies-using-ai-to-recreate-voices-of-late-singers-bamba-bakya-shahul-hameed-nrps-503245.html”]
sacnilk च्या अहवालानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलिज करण्यात आलेल्या फायटर चित्रपटाने पहिल्या दिवशी 22.5 कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 39.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 27.5 कोटी, चौथ्या दिवशी 29 कोटी, पाचव्या दिवशी 8 कोटी, सहाव्या दिवशी म्हणजे मंगळवारी या चित्रपटाची कमाई घसरली आणि केवळ 7.75 कोटींची कमाई झाली. एकूण 6 दिवसांत चित्रपटाने 134.25 कोटी रुपयांची कमाई केली.
चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पादुकोन आणि अनिल कपूर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या शिवाय करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबरॅाय, संजीदा शेखही महत्त्वाच्या भुमिकेत आहे. उल्लेखनीय आहे की फायटर व्यतिरिक्त साऊथचे मलाइकोताई वलिबान आणि सिंगापूर सलून देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. मात्र, दोन्ही चित्रपट फायटरपेक्षा खूपच मागे आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवर सातत्याने कमाई करत आहे. याशिवाय सालार, डंकी, गुंटूर करम, हनु मान आणि कॅप्टन मिलर या चित्रपटांनीही चांगली कमाई केली आहे. हृतिक रोशन या सिनेमात वैमानिकाच्या भूमिकेत आहे. पण त्याचे सीनियर अनिल कपूर त्याच्यावर नाराज आहेत. दीपिका पादुकोणदेखील या सिनेमात वैमानिकेच्याच भूमिकेत आहे. एकंदरीतच हा सिनेमा देशभक्तिच्या रंगात रंगलेला दिसत आहे.