संग्रहित फोटो
तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी मे महिन्यात मॅसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परातावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. चोरट्यांच्या आमिषाला ज्येष्ठ नागरिक बळी पडले. त्यांनी चोरट्यांशी विचारपूस केल्यानंतर बोलण्यातून आणखीनच ज्येष्ठाला विश्वासात घेतले. तसेच गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणूक केली. तेव्हा सुरुवातीला काही रक्कम तक्रारदारांच्या खात्यावर जमा केली. परतावा मिळाल्याचा मॅसेज पाठविला. मात्र, प्रत्यक्षात परतावा देण्यात आला नाही.
परतावा मिळाल्याचे भासविल्याने तक्रारदारांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात गेल्या चार ते पाच महिन्यात त्यांनी वेळोवेळी १५ लाख ७५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने अधिक तपास करत आहेत.
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ९९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






