फोटो सौजन्य - social media
भारतातील गडगंज श्रीमंत असलेले अंबानी कुटुंब सध्या लग्नसराईत व्यस्त आहेत. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलनात स्थित असलेल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे अनंत-राधिकाचा शाही लग्नसोहळा पार पडत आहे. या लग्नसोहळ्यात उपस्थिती दर्शवण्यासाठी जगभरातून अनेक दिग्गज मुंबईत दाखल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, क्रीडा, अभिनय तसेच व्यापार क्षेत्रातील प्रसिद्ध लोक शेकडोंच्या संख्येत या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. संपूर्ण बी-टाऊन या सोहळ्यात अनोख्या अंदाजात अवतरला आहे. प्रत्येकाने वेगळा असा लुक केला आहे. त्यांचे लुक नक्कीच पाहण्यासारखे आहेत.
अंबानी कुटुंबीय घरातील धाकट्या मुलाच्या लग्नासाठी पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. लाडक्या लेकाच्या लग्नासाठी वरमाई नीता अंबानींनी सौम्य टोनमध्ये अबू जानी संदीप खोसला लेहेंगा घातला आहे. पाहायला गेलं तर, संपूर्ण कुटुंबानेच लाईट पिंक टोनमध्ये वेश परिधान केले आहे. वराच्या वडिलांनी म्हणजेच मुकेश अंबांनी यांनी गुलाबी रंगाचा कुर्ता-पायजामा परिधान केला आहे. वराचे भाऊजी आनंद पिरामल यांनी पेस्टल टोन असलेला कुर्ता पायजमा परिधान केला होता, तर वाहिनी श्लोकाने गुलाबी लेहेंगा आणि भरभरून दागिने घातले होते.
अंबानी कुटुंबातील प्रत्येकाने काही हटके लुक केले आहे. पारंपरिक पोशाख परिधान करून त्यांनी आपली संस्कृती जपली आहे. आता भावाचं लग्न म्हटले तर बहीण काय शांत बसणार होय? अनंत अंबानी यांची बहीण इशा अंबानीने एकदम हटके आणि क्लासी लुक केला आहे. कुटुंबाप्रमाणे इशाने देखील लाईट टोनमध्ये पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. तिने ब्लूश गुलाबी टोनमध्ये अबू जानी संदीप खोसला लेहेंगा परिधान केला आहे. विशेष म्हणजे तिने परिधान केलेल्या चोळीला सोन्या चांदीच्या जरीची डिझाईन आहे. बेज टोन असलेल्या मॅचिंग दुप्पटयासह इशा अंबानी एखाद्या परीसारखी दिसत होती. इशा अंबानीने गळ्यात घातलेला डायमंड नेकलेस सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करत होता. नेकलेसमध्ये डायमंडने बनवलेले अनेक ह्रदय आणि फुलांचे आकृतिबंध होते. नेकलेसची किमंत खरोखरच विचारांच्या पलीकडलीच असेल.