मार्च २०२६ अखेर राज्याच्या तिजोरीवर ९.३२ लाख कोटींचे कर्ज
राज्याचे दरडोई उत्पन्नही वाढले असून २०२५-२६ साठी ते ३ लाख ४७ हजार ९०३ रुपये इतके राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ते ३ लाख १७हजार रुपये होते. देशातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून राज्याने पुन्हा अव्वल स्थान राखले आहे. मात्र महसुली जमेपेक्षा खर्च अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२५-२६ मध्ये महसुली उत्पन्न ५ लाख ६० हजार ९६४ कोटी रुपये अपेक्षित असताना खर्च ६ लाख ६ हजार ८५५ कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची महसुली तूट राहणार आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांसारख्या योजनांमुळे खर्चात वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
कृषी क्षेत्रात यंदा सरासरीपेक्षा १०९ टक्के पाऊस झाला. खरीप हंगामात १५७.२७ लाख हेक्टरवर पेरणी झाली. तृणधान्य, ऊस आणि कापूस उत्पादनात वाढ अपेक्षित असली तरी कडधान्य आणि तेलबिया उत्पादनात अनुक्रमे २८.२ टक्के आणि ४७.४ ₹ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. सिंचनाच्या टक्केवारीबाबत मात्र यंदाही अहवालात माहिती देण्यात आलेली नाही. जून २०२४ अखेर मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांतून ५७.१६ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प आज केला जाणार सादर;
सन २०२५-२६ मध्ये कर महसूल ४.७७लाख कोटी आणि करेतर महसूल ३३ हजार ५२ कोटी अपेक्षित
सप्टेंबर २०२५ पर्यंत ४३,८९४ कोटी रुपयांचे पीक कर्ज आणि ६८,३१४ कोटी कृषी मुदत कर्ज वितरित
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ४ लाख शेतकरी बाधितः ३३७ कोटी रुपयांची मदत
नवीकरणीय ऊर्जेच्या क्षमतेत राजस्थान आणि गुजरातनंतर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
३१ जानेवारी २०२६ पर्यंत ई-श्रम पोर्टलवर राज्यातील १.८३ कोटी कामगारांची नोंद
राज्यातील बेरोजगारीचा दर ३.३ टक्के असल्याची अहवालात नोंद,






