सौजन्य- इंस्टाग्राम
सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित 2898 एडी अखेर रिलीज झाला आहे. संपूर्ण भारतात प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटाच्या व्यवसायही किती करणार याविषयी उत्सुकता होती. पहिल्या दिवशी, कल्की 2898 एडीने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत 50 कोटींहून जास्त कलेक्शन केले आहे. कल्कीमध्ये प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दिपिका पादुकोण ही तगडी स्टार कास्ट आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी कल्की चित्रपट एक पर्वणी आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या सायन्स फिक्शन फ्युचरिस्टिक चित्रपटाने सुरुवातीच्या दिवशीच तगडे कलेक्शन करुन बॉक्स ऑफिसवरचा दुष्काळ संपविला आहे. कल्कीची ओपनिंग ही बॉक्स ऑफिससाठी नवी उर्जा देणारी ठरणार आहे.
कल्कीने रचला नवा विक्रम
‘कल्की 2898 एडी’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ज्याप्रकारे यश मिळवले आहे, त्यामुळे हा चित्रपट या वर्षातील सर्वात हिट चित्रपट ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता, ‘कल्की 2898 एडी’ पहिल्याच दिवशी 2024 मधील सर्वात मोठा पॅन इंडिया ओपनर बनून इतिहास बनू शकतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तथापि, ‘कल्की 2898 AD’ अजूनही एक रेकॉर्ड आहे. देशात 2024 मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
कल्कीला रिव्ह्यू कसे मिळाले?
‘कल्की 2898 एडी’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्टारकास्टचा उत्कृष्ट अभिनय आणि चित्रपटाच्या उत्कृष्ट व्हीएफएक्सचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक ‘कल्की 2898 एडी’ला उत्कृष्ट नमुना म्हणत आहेत.
काय आहे कल्कीची कहाणी?
‘कल्की 2898एडी ‘ हा चित्रपट कलियुगातील विष्णूच्या कल्की अवतारावर आधारित आहे आणि त्याचा महाभारतातील अश्वथामाशी संबंध आहे. कथेत भविष्यातील जग दाखविले गेले आहे. त्यामुळे त्या जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आश्चर्यकारक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. कल्कीबद्दल खूप काळापासून चर्चा आहेच आणि आज चित्रपटाच्या सुरवातीच्या कमाईने कळते की प्रेक्षकांना कल्की थिएटरपर्यंत आणण्यासाठी यशस्वी ठरला आहे.