बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) भारतीय जनता पक्षाची उमेदवार आहे. ती हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवत आहे. चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ही अभिनेत्री आता राजकारणाकडे वळली आहे. ती तिच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिला विचारण्यात आले की निवडणूक जिंकल्यानंतर ती बॉलिवूड सोडणार का? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले, ‘हो.’ नेमकं काय म्हणाली कंगना जाणून घ्या.
[read_also content=”‘वयाच्या 13 व्या वर्षी माझे फोटो अश्लील साईटवर लिक झाले होते’ जान्हवी कपूरचा धक्कादायक खुलासा https://www.navarashtra.com/movies/janhvi-kapoor-shocking-statement-her-photo-was-leaked-on-adult-site-nrps-535292.html”]
बॅालिवूडवर केली टिका
एका संवादादरम्यान अभिनेत्री कंगना राणौतवे बॅालिवूडवर टिका केली. ती म्हणाली की, बॉलीवूडमध्ये चुकीची धारणा निर्माण होते. हे ‘फिल्मी जग खोटं आहे, तिथे सगळं खोटं आहे. तो एक वेगळ्या प्रकारचे वातावरण तयार करतो. हे बनावट बुडबुड्यासारखे चमकणारे जग आहे आणि हे त्याचे सत्य आहे.
कंगनाने बॉलिवूड सोडावं असं दिग्दर्शकाला वाटत नाही
कंगनाने संवादादरम्यान सांगितले की, जर तिने बॉलिवूड सोडले तर अनेकांचे मन दुखेल. अभिनेत्रीने सांगितले की, अनेक दिग्दर्शक आहेत जे तिच्या या कल्पनेने नाराज आहेत आणि त्यांना अभिनेत्रीने बॉलिवूड सोडावे असे वाटत नाही. ती म्हणाली की, ‘बरेच दिग्दर्शक मला सांगतात की आमच्याकडे चांगली अभिनेत्री आहे, कृपया जाऊ नका. मी चांगला अभिनय करते.
Web Title: Kangana ranaut claims she will quit the bollywood if wons the mandi lok sabha election 2024