(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेते टोविनो थॉमस आणि कल्याणी प्रियदर्शन यांचा ‘लोका चॅप्टर 1- चंद्रा’ हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘हृदयपूर्वम’ सोबत प्रदर्शित झाला होतो. आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी JioHotstar वर ओटीटी डेब्यू करणार आहे. हा चित्रपट मलयाळमसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली आणि मराठी अशा सात भाषांमध्ये पाहता येईल.
स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने चित्रपटाच्या प्रचंड यशाचा आनंद साजरा करत एक नवं पोस्टर रिलीज केलं आहे. त्यात हेही स्पष्ट करण्यात आलं आहे की ‘लोका चॅप्टर 1: चंद्रा’ केरलच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून त्याने जगभरात तब्बल ₹३०० कोटींचा टप्पा पार केला आहे.हा चित्रपट मल्याळममधील पहिला सुपरवुमन चित्रपट आहे. मल्याळम सिनेइंडस्ट्रीत असा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे. या चित्रपटाद्वारे मल्याळम सिनेविश्वात पहिल्या मायथोलॉजिकल युनिव्हर्सची सुरुवात झाली आहे.
सोशल मीडियावर लोकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. एका यूझरनं लिहिलं की केवळ 30 कोटींमध्ये बनलेल्या चित्रपटाचे व्हिज्युअल असे आहेत जसे 300 कोटींमध्ये बनलेल्या चित्रपटाचे असतील.
या चित्रपटात कल्याणी प्रियदर्शन आणि टोविनो थॉमस यांच्या भूमिका आहेत. दुलकर सलमाननं देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.डोमिनिक अरुण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 2021 मध्ये ‘मिन्नल मुरली’ नावाचा मल्याळम सुपरहिरो चित्रपट आला होता, पण ‘लोका’ एका महिलेवर आधारित आहे.या चित्रपटातील व्हीएफएक्स (VFX) आणि कथा लोकांना आकर्षित करत आहे.
हा चित्रपट केवळ आपल्या कथानक आणि अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या भव्य व्हिज्युअल्स आणि मन मोहून टाकणाऱ्या संगीतासाठीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.






