केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील मोस्ट ट्रेडींग गाण्याने अनेकांना अक्षरश: भुरळ घातली. सगळ्यांनी या गाण्यावर ठेका धरला. अखेर माधुरी दीक्षितचीही (madhuri dixit) पावलं या गाण्यावर थिरकली. वयाच्या 56 व्या वर्षीही माधुरीचं सौंदर्य चाहत्यांना भुरळ घालतयं. ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवणाऱ्या डान्सिंग क्वीनला मराठी गाण्याची भुरळ पडणार नाही असं थोडचं होईल. (kedar shinde, sana kedar shinde)
https://www.youtube.com/watch?v=8W_Uzkwe2mo
माधुरी दीक्षितने ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर रील बनवून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. माधुरीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षितने लाल रंगाची साडी नेसून बहरला हा मधुमास गाण्यावर डान्स केलायं. माधुरी दीक्षितच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘बहरला हा मधुमास’ गाण्यावरील माधुरी दीक्षितचा रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी माधुरीचे “मनापासून धन्यवाद मानले आहेत. माझ्या “महाराष्ट्र शाहीर” या चित्रपटातलं हे गाणं आहे. तुम्ही ते सादर केलं याचा मराठी म्हणून विशेष अभिमान आणि आनंद आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. नक्की पाहा एका मराठी थोर कलाकार शाहीर साबळे यांना ती मानवंदना ठरेल. जय महाराष्ट्र,” असं केदार शिंदेंनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.
[read_also content=”कॅटला आवडतो सासूच्या हातचा…..‘हा’ पदार्थ! ‘पराठा वेड्स पॅनकेक्स’ च्या गुपिताचा विकीनेच केला खुलासा https://www.navarashtra.com/entertainment/katrina-likes-to-eat-paratha-412567/”]
या आधी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह किली आणि निमानेहीबरोबर जपानी कलाकारांनी या गाण्यावर रील करून त्यांच्या फॉलोओर्सची मनं जिंकली होती.
‘बहरला हा मधुमास’ हे गाणं ‘महाराष्ट्र शाहीर’ या मराठी चित्रपटातलं असून, या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. या गाण्याने घराघरात सर्वांनाच भुरळ घातली. (maharashtra shahir)