मुंबई : पाकिस्तानमधील एका तरुणीचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या तरुणीने लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर डान्स केला असून पाकिस्तानी तरुणीचा हा ट्रेंड अनेकजण फॉलो करीत आहे. या ट्रेंडला आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने देखील फॉलो केल असून माधुरीने याचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र माधुरीच्या या डान्स व्हिडिओमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे.
पाकिस्तानमधील आयेशा नावाच्या तरुणीने लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर तिच्या मेहेंदी समारंभात नृत्य केलं होत. तिच्यानंतर याच गाण्यावर अभिनेत्री माधुरी दीक्षितने देखील डान्स व्हिडीओ बनवला. या व्हिडीओला कमेंट करत अनेक नेटकरी माधुरीला ट्रोल करत आहेत. माधुरीच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘या ट्रेंडचा व्हायरस भारतात देखील आला.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘ओह नो, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’. ‘तुम्ही माझ्या फेवरेट आहात. प्लिज असला थर्ड क्लास ट्रेंड फॉलो करु नका’, अशी देखील कमेंट एका नेटकऱ्यानं केली.