'आम्हाला एका भयानक घटनेबद्दल बोलायचं आहे', स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाल्यानंतरची पोस्ट व्हायरल
नुकताच प्रदर्शित झालेला स्काय फोर्स सिनेमा प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबतच अजून एका नवोदित अभिनेत्याचे नाव सध्या खूप चर्चेत आहे. ते नाव म्हणजे वीर पहारिया. वीर पहारियाचा हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अनेकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले तर काहींनी त्याला ट्रॉल देखील केले. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने देखील वीर पहारियाबाबत जोक केला होता. धक्कादायक म्हणजे या जोकमुळेच प्रणित मोरेवर हल्ला झाला आहे. या घटनेबाबत प्रणित मोरेच्या टीमने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
घडलेल्या घटनेबाबत प्रणित मोरेची टीम लिहिते की आम्हाला एका भयानक घटनेबद्दल बोलायचं आहे, जी अलीकडेच घडली आहे. २ फेब्रुवारी २०२५ रोजी, संध्याकाळी ५:४५ वाजता, सोलापूरमधील 24K Kraft Brewzz येथे प्रणितचा स्टैंड-अप शो झाल्यानंतर, तो नेहमीप्रमाणे चाहत्यांना भेटण्यासाठी आणि फोटोसाठी थांबला. गर्दी कमी झाल्यावर, ११-१२ जणांचा गट, चाहत्यांच्या वेशात त्याच्याजवळ आला. पण ते फोटोसाठी आले नव्हते-ते त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी आले होते. त्यांनी निर्दयपणे त्याला मारहाण केली-त्याच्यावर सतत ठोसे आणि लाथांचा वर्षाव केला, ज्यामुळे तो जखमी झाला.
या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार तनवीर शेख होता. त्याने आणि त्याच्या टोळीने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “आगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा!”-याचा थेट अर्थ म्हणजे पुन्हा जोक केल्यास परिणाम अधिक गंभीर असतील.
Prem Dhillon: कॅनडामधील गायक प्रेम ढिल्लन यांच्या घरावर गोळीबार, या गँगने उचलली हल्ल्याची जबाबदारी!
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे व्हेन्यू, 24K Kraft Brewzz, येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. आणि आता सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी केलेल्या अनेक विनंत्यांना त्यांनी नकार दिला आहे.
आम्ही पोलीसांकडेही मदतीसाठी संपर्क केला, त्यांनी मदतीसाठी येतो असे सांगितले, पण कोणीही आले नाही.
जर केवळ विनोद केल्यामुळे एका कॉमेडियनवर हल्ला होऊ शकतो, तर याचा अर्थ आपल्या मूलभूत हक्कांचे आणि सुरक्षिततेचे काय?
एक महाराष्ट्रीयन कलाकार म्हणून, आम्हाला कधीच वाटले नव्हते की महाराष्ट्रातच एका कलाकारावर असा हल्ला होईल, फक्त त्याच्या कामामुळे.
‘छावा’ चित्रपटाआधी विकी कौशल आणि अक्षय खन्ना होते एकमेकांचे पक्के शत्रू? कारण जाणून वाटेल आश्चर्य!
आम्ही हे प्रकरण लोकांसमोर मांडत आहोत, कारण लोकांनी सत्य जाणून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र हे प्रणितचे घर आहे, आणि आम्हाला विश्वास ठेवायचा आहे की इथे संवाद आणि विनोद यांचं स्थान कधीच हिंसेने आणि दबावाने घेतलं जाऊ शकत नाही.
हे अत्यंत निराशाजनक, संतापजनक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही मुंबईतून ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. आम्ही प्रशासनाला आग्रहाने विनंती करतो की त्यांनी त्वरित योग्य कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत.
जय महाराष्ट्र !
– Team प्रणित