(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
लोकप्रिय पंजाबी गायक प्रेम ढिल्लन यांच्या कॅनडामधील घराबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आहे. गोळीबाराची ही घटना काल, सोमवारी घडल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयपाल भुल्लर टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच गायकाला धमकी देण्यात आली आहे. या बातमीने आता गायकाचे चाहते चकित झाले आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आपण आता जाणून घेणार आहोत.
कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली
गायक प्रेम ढिल्लन यांच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सध्या तपास सुरू आहे आणि पोलिस त्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मिरर नाऊच्या वृत्तानुसार, ‘पंजाबी गायक प्रेम ढिल्लन यांच्या कॅनडा येथील घरावर नुकतेच गोळीबार करण्यात आला आहे. यामुळे कलाकारांच्या सुरक्षिततेबद्दल आणि संघटित गुन्हेगारीच्या व्याप्तीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.’ गायकाचे चाहते देखील चिंता व्यक्त करत आहेत.
“अरे हा तर चायनाचा माल निघाला…”; ‘लक्ष्मीनिवास’चा थुकरट टीझर पाहून नेटकरी संतापले
व्हायरल पोस्टमध्ये जयपाल भुल्लर टोळीने जबाबदारी घेतली
जयपाल भुल्लर टोळीने एका व्हायरल पोस्टमध्ये त्याची जबाबदारी घेतली. त्यात दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांचाही उल्लेख होता. २०२२ मध्ये पंजाबमधील मानसा जिल्ह्यात मूसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तसेच, पोस्टमध्ये तुरुंगात बंद गुंड जग्गू भगवानपुरियाचा उल्लेख होता. आता ही गॅंग गायकांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरील देखील जबाबदारी साकारणार आहे.
देण्यात आली धमकी
व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे ठामपणे म्हटले आहे की, तो कोणालाही फसवण्यावर विश्वास ठेवत नाही, परंतु हे पाऊल उचलणे आवश्यक झाले होते. त्याला शेवटचा इशारा देत त्यांनी म्हटले की जर त्यांनी अजूनही आपले मार्ग सुधारले नाहीत तर ते कॅनडाला गेले किंवा इतर कुठेही गेले तरी ते टिकू शकणार नाहीत. तसेच, असे म्हटले होते की जो माणूस अशा देशद्रोही व्यक्तीला आपल्यासोबत ठेवतो त्याला दुसऱ्या कोणत्याही शत्रूची गरज नसते. पोस्टच्या शेवटी धमकीच्या शब्दात लिहिले होते की, ‘तुमचे कफन तयार ठेवा’ ही शेवटची चेतावणी आहे.
‘छावा’ चित्रपटाआधी विकी कौशल आणि अक्षय खन्ना होते एकमेकांचे पक्के शत्रू? कारण जाणून वाटेल आश्चर्य!
गेल्या वर्षीही गोळीबार झाला होता
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, कॅनडातील व्हँकुव्हर व्हिक्टोरिया बेटावर असलेल्या पंजाबी गायक एपी ढिल्लन यांच्या घरी गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गोदरा टोळीने घेतली होती. या घटनेनंतर कॅनेडियन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.