Amruta Khanvilkar
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या कामामुळे आणि कौशल्यामुळे नेहमीच चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. तिचे नवनवीन चित्रपट, प्रोजेक्ट्स आणि आयुष्यातील अनेक गोष्टी ती चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. तसेच सध्या अभिनेत्री झी मराठी वरील ड्रामा ज्युनियर हा शो जज करताना दिसत आहे. तसेच तिच्या सोबत धमाकेदार अभिनेता आणि लेखक संकर्षण कऱ्हाडेदेखील तिला अप्रतिम साथ देताना दिसतो आहे. याचदरम्यान अमृताने प्रेक्षकांना आणखी एक गोड बातमी दिली आहे. अमृताने थिएटर डान्स म्युझिकलची सोशल मीडियावर घोषणा केली आहे. या सुंदर आणि नव्या प्रवासात तिला आशिष पाटीलदेखील साथ देताना दिसणार आहेत.
अमृता आणि आशिषचा हा नवीन प्रोजेस्ट पूर्णतः नाट्य नृत्यावर अवलंबून असणार आहे. यासाठी हे दोघेही एकत्र काम करताना दिसणार आहेत. तसेच तिने या नव्या प्रकल्पाची सुरुवात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सुरु केली आहे. अभिनेत्रीने दादर मधील सिद्धिविनायक या मंदिराला भेट देऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहेत. तसेच, बाप्पाच्या आशीर्वादाने नक्कीच तिचा हा प्रोजेक्ट मोठा आणि यशस्वी ठरेल यात शंकाच नाही.
अमृताने शेअर केली पोस्ट
अमृता आणि आशिषने हे भव्य नाट्य पदर्पणाआधी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहेत. याचदरम्यान अमृताने हि सुंदर पोस्ट देखील केले आहेत. या प्रकल्पाबद्दल सांगताना अमृताने पोस्ट मध्ये लिहिले की, ‘ड्रीम टीमसोबत माझ्या पहिल्या थिएटर डान्स म्युझिकलची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे, या आणि 90 मिनिटांच्या प्रवासाचा अनुभव घ्या जिथे आम्ही भक्ती, शृंगार आणि शिवशक्तीच्या माध्यमातून स्त्रीचे पैलू शोधतो. तिची कथा सांगणाऱ्या शुद्ध अर्ध-शास्त्रीय आणि शास्त्रीय नृत्य प्रकारांसह “स्त्रीच्या जगात” स्वतःला मग्न करून घेण्यासाठी सज्ज व्हा.” असे तिने लिहिले. तसेच पुढे तिने लिहिले की, “वर्ल्ड ऑफ स्त्री” मध्ये तुमचे स्वागत आहे, आशिष पाटील आणि अमृता खानविलकर यांची नृत्यगाथा’, असे तिने कॅप्शन लिहून चाहत्यांना आनंदी केले आहे.
अमृता कायम तिच्या सोशल मीडियावर फोटो किंवा रील शेअर करताना वारंवार दिसत असते. तसेच तिचा हा नवा अर्ध-शास्त्रीय आणि शास्त्रीय नृत्य या प्रकल्पाबद्दल चाहत्यांची आतुरता वाढली आहे. अमृता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही, ती नेहमी कोणते ना कोणते नवीन प्रोजेट्स घेऊन येण्यासाठी सज्ज असते.
हे देखील वाचा- अमृताने आईसाठी शेअर केली एक खास पोस्ट, म्हणाली- “स्वामींची कृपा”!
अमृताचे नवीन चित्रपट
अमृताने 2024 वर्षाची सुरुवात दमदार केली आहे आणि येणाऱ्या काळात देखील ती अजून उत्तोमतोम चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. हिंदी आणि मराठीत अमृता आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून देत असून आता येणाऱ्या काळात ती काय नवीन घेऊन येणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. अमृता तिचा नव्या प्रोजेक्ट आणि नव्या भूमिका घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या समोर येईल अशी आशा आहे. ती सध्या मराठी शो ड्रामा ज्युनियर जज करताना दिसत असून, तसेच हिंदी वेब सिरीज ’36 डे’मध्ये ती प्रेक्षकांना दिसली होती. आणि आता आगामी काळात अमृता ‘कलावती , ललिता बाबर, पठ्ठे बापूराव’ या मराठी चित्रपटात देखील झळकणार आहे.