मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत अभिनयसह तिच्या प्रत्येक गाण्यावर चाहत्यांना थिरकायला भाग पाडते. तसेच सध्या अभिनेत्री पूजा सावंत तिच्या नुकत्याच झालेल्या लग्नामुळे ती चर्चेत आहे. लग्नानंतर पूजा प्रत्येक घरघुती कार्यक्रमात भाग घेताना दिली आहे. त्याचे व्हिडीओ आणि फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजा सतत तिच्या इंस्टाग्राम हँडलवर सक्रिय असते. अश्यातच तिने नुकताच एक व्हिडीओ प्रेक्षकांसाठी शेअर केले आहे. सगळ्यांची आवडती अभिनेत्री पूजा सावंत लवकरच एका नव्या प्रोजेक्टमध्ये चाहत्यांना दिसणार आहे.
तिने शेअर केलेलय इंस्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये ती एका मराठी गाण्यामध्ये नृत्य करताना दिसत आहे. या गाण्याच्या व्हिडिओ पूजाने मराठमोळा साज परिधान केला आहे. आणि हे गाणं सुद्धा पारंपरिक पद्धतीत सादर केले आहे असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या गाण्याचे नाव ‘नाच गो बाया’ हे अजून हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यामध्ये पूजाने केसरी आणि हिरव्या रंगाची काठ असलेली नववारी साडी परिधान केली आहे. आणि या गाण्यामध्ये ती खूप सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे.
पूजाचा लग्नानंतरचा हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे याद्वारे ती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. तसेच या गाण्याचा व्हिडिओ पूजाने स्वतः आपल्या इंन्स्टा हँडलवर शेअर केले आहे. या पोस्टला तिने, ‘ माझ्या नवीन गाण्याचा टिझर आलेला आहे.. ‘नाच गो बाया’ हे गाणं येणार ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला’ या कॅप्शनसह तिने चाहत्यांना सांगितले आहे. या व्हिडिओ ला चाहत्यांचा भरपूर प्रतिसाद येताना दिसत आहे. असेच नवनवीन प्रोजेक्ट घेऊन अभिनेत्री पूजा सावंत प्रेक्षकांच्या भेटीस येईल ही आशा आहे.