आज 17 ऑगस्ट रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील लाकडी जोडी सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर वाढदिवसाचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. दोघांनीही त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रेया पिळगांवकरने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहे. ही जोडी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात प्रसिध्द आहे. तसेच नवरा माझा नवसाचा या चित्रपटातून दोघांनीही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. नुकताच नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिध्द झाला आहे.
सचिनने पाचव्या वर्षांपासून सुरु केले काम
सचिन पिळगांवकर यांनी मराठी चित्रपटासोबत हिंदी, भोजपूरी चित्रपटात अभिनयाचे काम केले. कलाकार म्हणून प्रसिध्द तर आहेत. सोबत निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत काम केले आहे. अगदी पाच वर्षापासून त्यांनी चित्रपटामध्ये अभिनय करण्याची सुरुवात केली. सचिन यांना वयाच्या ५व्या वर्षी बालकलाकारासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.
जोडपं सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत
सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन पिळगावकर यांनी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांचा टीव्ही शो ‘तू तोता तू मैना’ दूरदर्शनवर सुपरहिट ठरला. सुप्रिया आणि सचिनच्या लग्नाला ३८ वर्षे झाली आहेत. दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. सचिन पिळगांवकर यांनी सुप्रिया याना एका चित्रपटाच्या सेटवर प्रपोज केले होते. सचिन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. सचिनच्या आईनेच सचिनला तिच्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर सुप्रिया पिळगांवकर म्हणाल्या की, तेव्हा सचिन त्याच्या ‘नवरी मिळेल नवऱ्याला’ या मराठी चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीच्या शोधात होता, तेव्हा त्यांच्या आईने तिचा दूरदर्शनवरील अभिनय पाहिला आणि सचिनला तिला कास्ट करण्याचा सल्ला दिला.
यानंतर अनेक चित्रपटामध्ये या जोडप्यांची एकत्र काम केले आणि चाहत्यांना खुश केले. दोघांनीही अनेक मराठी चित्रपट केले ज्यामध्ये नवरा माझा नवसाचा, माझा पती करोड पती, अशी ही बनवाबनवी, नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या अनेक चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे.
अभिनयाचे अष्टपैले असलेले सचिन यांनी प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यांनी आता पर्यत १००हून अधिक चित्रपटात काम केले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही चाहत्यांनी रात्रीचे १२ वाजता त्यांना केक पाठला होता. हा केक कापून त्यांना वाढदिवस साजरा केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. तसेच अनके मराठी आणि बॉलीवूड कलाकारांनी या जोडीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याचदरम्यान या व्हिडिओला चाहत्यांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला आहे.