(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये जोरदार उत्सुकता निर्माण झाली आहे.सिनेमात लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच सिद्धार्थच्या जबरदस्त लूकचं अनावरण करण्यात आलं होतं, ज्यामुळे चाहते थक्क झाले होते.सध्या सिनेमातील सिद्धार्थच्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
चाहत्यांच्या प्रेमाबरोबरच, सिद्धार्थने महेश मांजरेकरांसाठीही खास पोस्ट शेअर केली आहे ज्यातून त्याने त्यांचे आभार मानले आहेत. सिद्धार्थने ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील आपल्या ‘उस्मान खिल्लारी’ भूमिकेचा खास उल्लेख केला आहे. ही भूमिका आव्हानात्मक होती, पण मांजरेकरांच्या मार्गदर्शनामुळेच तो त्या भूमिकेला न्याय देऊ शकल्याचं त्यानं म्हटलं.
शाहरुख खानचा ६० वा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा: Karan Joharते राणी मुखर्जीपर्यंत अनेक स्टार्सची हजेरी
सिद्धार्थ जाधवने पोस्टमध्ये लिहिलं आहे, ”Mahesh sir तुमच्यासाठी काय लिहावं हेच कळत नाहीये. तुम्ही केवळ एक दिग्दर्शक नाही, तर माझ्या आयुष्यातील ‘देवमाणूस’ आहात.तुमच्यासोबत काम करताना एक ‘अभिनेता’ म्हणून सिद्ध करण्याची संधी देता. ‘दे धक्का’’ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘लालबाग परळ’‘शिक्षणाच्या आईचा घो’‘कुटुंब’ते आजच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’पर्यंत…”
सिद्धार्थने कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे, ”तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळेच मी माझ्या कामातून वेगवेगळ्या भूमिका साकारू शकलो. तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी उस्मान खिल्लारी सारख्या एका आव्हानात्मक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.त्या भूमिकेला आणि सिनेमाला आज खूप प्रेम मिळतंय.सर, तुमचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक निर्णय माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. Love you sir!”






