(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मुंबईतील पवई परिसरात शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरए स्टुडिओच्या इमारतीत १७ मुलं आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवले होते.पोलिसांनी वॉशरूममधून प्रवेश करून 17 मुलांची सुटका केली. यावेळी मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि त्याचा एन्काऊंटर केला, ज्यात रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणानंतर मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. कारण एनकाउंटर झालेल्या आरोपी रोहित आर्यने अनेक मराठी कलाकारांशी संपर्क साधला होता, अशी माहिती समोर आली आहे. काही कलाकार त्याच्या आरए स्टुडिओत गेले होते, अशीही माहिती समोर आली आहे.
अभिनेता आयुष संजीव हा या घटनेच्या चार दिवस आधीच रोहित आर्यला भेटला होता. तसेच ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील मंजू म्हणजेच अभिनेत्री स्नेहल चांदवडकर ही देखील या स्टुडिओत गेल्याचं समोर आलं आहे.
स्नेहलने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली.
या घटनेनंतर आता मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आपले अनुभव शेअर करत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, रोहित आर्यच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात कोण आहे गारुडी? एकता कपूरने स्पर्धकांना दिला अनोखा टास्क
स्नेहल पोस्ट शेअर करत लिहिले, “नशीब म्हणू की काय म्हणू…खरंच शब्द नाहीत. ३० ऑक्टोबरला आरए स्टुडिओ पवई येथे ही भयानक घटना घडली. मी स्वतः त्या मुलांची कार्यशाळा घेतली होती; ज्यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. देवाच्या कृपेने ती सगळी मुलं सुखरुप आहेत आणि मी सुद्धा भाग्यवान आहे. ज्यादिवशी ही घटना घडली त्यादिवशी आमचं कोणतंही चित्रीकरण नव्हतं…जेव्हा ही घटना कानावर आली तेव्हा खरंच खूप धक्का बसला.”
शाहरुख खानचा ६० वा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा: Karan Joharते राणी मुखर्जीपर्यंत अनेक स्टार्सची हजेरी
यानंतर स्नेहलने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं ,“मला २७ ऑक्टोबरला मिटींगसाठी आरए स्टुडिओत बोलावलं होतं, कारण त्यांनी माझं काम आधीच पाहिलं होतं. मी २७ नाही गेले पण २९ तारखेला गेले. तिथे माझी रोहित आर्यशी भेट झाली. सगळ्या कलाकारांना बसवून एका वेबसीरिजची माहिती देण्यात आली आणि कोण कोणत्या भूमिकेत दिसणार याबद्दलही सांगण्यात आलं. मी आणि माझ्याबरोबर NSDची एक आर्टिस्ट होते. आम्हाला सांगण्यात आलं होतं की, पालकांना शूटिंग कसं असतं ते दाखवण्यासाठी एक मॉकशूट करायचं आहे. आम्ही एक सीन सुद्धा शूट केला. पण त्यानंतरच्या शूटसाठी मी गेले नव्हते. दुपारी सगळं व्यवस्थित होतं, पण संध्याकाळी कळलं की त्यांनी वेबसीरिज Reel साठी नाही, तर Real मध्ये केली आहे… मला खरंच मोठा धक्का बसला.”






