मराठी सिनेसृष्टीतील अनेक विनोदवीरांनी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडलं. त्यातलंं एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. सध्या अशोक मा.मा. या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेतून अभिनेते अशोक सराफ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ चक्क डफली वाजवताना दिसत आहेत.
अशोक सराफ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर डफली वाजवतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पिवळा कुर्ता परिधान केलेले अशोक मामा डफली वाजवतानाचा आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ अशोक मा.मा. या मालिकेच्या शुटींगदरम्यानचा आहे. या व्हिडीओवर अशोक मामांच्या चाहत्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे. चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं आहे की, धन्यवाद मामा तुमच्यामुळे आमचं बालपण आनंदाचं गेलं तर काहींना हार्ट देऊन प्रेम व्यक्त केलं आहे. आणखी एका युजरने आता तुमचा नवा सिनेमा कधी येणार असं देखील विचारलं आहे.
जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत असलेला हा चाहतावर्ग अशोक सराफ यांना प्रेमाने मामा देखील म्हणतात. आज लक्ष्मीकांत बेर्डे पाहिजे होते त्यांच्या बरोबरचे तुमच्या सिनेमे पाहणं या आनंदाला मराठी प्रेक्षकवर्ग मुकला असल्याची खंत देखील अनेकांनी व्यक्त केली आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मा.मा. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम देखील मिळत आहे. मालिकेत अशोक मामा हे कडक शिस्तीचे खाष्ट पण तितकेच मनमिळावू आणि प्रेमळ व्यक्तीमत्व अशी त्यांची भूमिका आहे.