(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मिराई चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. रिलीज होण्याआधीच मिराई हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होता. १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.‘मिराई’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तेराव्या दिवशीही घोडदौड सुरूच आहे. चित्रपटाने आपल्या दुसऱ्या आठवड्याच्या १३व्या दिवशी म्हणजेच बुधवारी १.५ कोटींची कमाई केली असून, सर्व भाषांतील एकत्रित एकूण कमाईने ८४ .०५कोटींचा टप्पा पार केला आहे.
तेजा सज्जा यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘मिराई’ हा फँटसी अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतो आहे. विशेषतः तेलुगू भाषेतील शोना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हिंदी शोसाठी प्रेक्षकांची उपस्थिती : ७.८९% इतकी होती तर तेलुगू शोसाठी उपस्थिती प्रेक्षकांची उपस्थिती १६.९०% चित्रपटात अॅक्शन, बेस्ट व्हिज्युअल्स आणि चांगली कथा असल्यामुळे तो प्रेक्षकांना खूप आवडतो आहे.आत्तापर्यंत चित्रपटाने ८४ कोटींची कमाई केली असून लवकरच तो १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचेल अशी शक्यता आहे.
‘आता सलमान गुडघ्यावर येईल, तळवेही…’ दबंग सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या निशाण्यावर भाईजान!
मराई चित्रपटाचे बजेट अंदाजे ६० कोटींचे आहे. ज्यामध्ये भव्य VFX पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या १२५ दिवसांत पूर्ण झाले आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटांमधील सर्वात महागडा आणि पौराणिक कथांवरील चित्रपटांपैकी एक मानला जातो.मराई चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाची दृश्ये, पौराणिक ट्विस्ट, आणिअॅक्शनचे कौतुक केले आहे.
भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही पहलगाम हल्ल्याच्या आधी शूट झाला होता तरी…’
‘मिराई’ चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती
‘मिराई’ हा चित्रपट ‘वेधा’ नावाच्या एका तरुणाची कथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटात वेधा नावाची भूमिका अभिनता तेजा सज्जा यांनी साकारली आहे. चित्रपट कथा अॅक्शन, आणि थोडासा भावनांनी भरलेला आहे. कार्तिक गट्टमनेनी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रदर्शनाच्या फक्त दोन दिवसांतच ‘मिराई’ ने जगभरात ५५ कोटींहून अधिक कमाई केली होती.