(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ 6 नवा सीझन सध्या प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या प्रेक्षकांसाठी एक दमदार ट्विस्ट पाहायला मिळत आहे. घरात स्पर्धकांच्या दरम्यान होणाऱ्या वादविवादाने आणि नव्या टास्कमुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
गेल्या काही दिवसांत घरात सदस्यांमध्ये थोडे फार मतभेद दिसू लागले आहेत, आणि नव्या टास्कमुळे गेमचं समीकरण बदललं आहे. काही सदस्यांनी रणनीती बदलत इतरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर काही सदस्यांनी घरातील वादातून स्वतःला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला.
या सगळ्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून, सोशल मीडियावर चाहत्यांनी घरातील घडामोडींवर प्रचंड प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बिग बॉस’ घरात प्रेक्षकांसाठी आता खरी धमाल सुरू होणार आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत लवकरच घरात एन्ट्री घेणार असल्याची माहिती मिळत आहे. घरातील सदस्य आतापर्यंत शांततेत असले तरी राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे घरात सगळं समीकरण बदलण्याची शक्यता आहे. राखीच्या एन्ट्रीमुळे घरातील सदस्यांची रणनीती, गेम प्लॅन आणि घरातील वाद यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
मिडिया रिपोर्टनुसार, राखी या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार असल्याचे समजत आहे. पण राखी घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार नाही अशी देखील माहिती मिळत आहे. तर ती या सीझनमध्ये केवळ 15 दिवसांसाठी म्हणजेच 2 आठवडे बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचं वृत्त आहे.त्यामुळे पाहुणी कलाकार म्हणून राखी घरात येईल. यावेळी राखी सावंत घरातील सदस्यांना पळो की सळो करून सोडणार, यात काहीच शंका नाही.राखी या दोन आठवड्यांसाठी घरात आल्यावर घरातील वातावरण कसे होते, कोणते गमे पालटणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.






