अजित वाडीकर (Ajit Wadikar) दिग्दर्शित ‘वाय’ (Y Marathi Movie) हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक जण ‘वाय’ अक्षराचे पोस्टर शेअर करत आहेत. कलाकारांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हा फोटो शेअर करत, माझा पाठिंबा आहे ! आपला? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला सर्वसामान्यांनीही पोस्टर शेअर करत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. आता खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil Shared Y Poster) यांनीही सोशल मीडियावर ‘वाय’चे पोस्टर शेअर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे ती ‘वाय’ नक्की आहे तरी काय, याची.
[read_also content=”चाकू हल्ला करून ट्रक चालकासह ढाबा व्यावसायिकाला लुटले, तीन आरोपी जेरबंद तर, दोघे फरार https://www.navarashtra.com/maharashtra/dhaba-businessman-along-with-the-truck-driver-was-stabbed-and-robbed-while-three-accused-were-arrested-while-two-absconded-nraa-284483.html”]
मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिची प्रमुख भूमिका असलेला, कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील ‘ती’च्या लढ्याची गोष्ट सांगणारा ‘वाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.