Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सागर कारंडेला चुना लावणाऱ्या ‘अक्षय कुमार’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, केली होती ६१ लाखांची फसवणूक

अभिनेता सागर कारंडे 'एक लाईक करा आणि पैसे कमवा' या स्किमला बळी पडला असून त्याला लाखोंचा फटका बसला आहे. अभिनेत्याला चुना लावणाऱ्या सायबर चोरट्याला सायबर चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 18, 2025 | 05:34 PM
सागर कारंडेला चुना लावणाऱ्या 'अक्षय कुमार'ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, केली होती ६१ लाखांची फसवणूक

सागर कारंडेला चुना लावणाऱ्या 'अक्षय कुमार'ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, केली होती ६१ लाखांची फसवणूक

Follow Us
Follow Us:

‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेला हास्यकलाकार, लेखक आणि अभिनेता सागर कारंडेला सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याची बातमी समोर आली होती. “इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाईक करा आणि दीडशे रुपये मिळवा” या स्किमच्या नावाखाली सागर कारंडेला सायबर चोरट्यांनी लाखोंचा गंडा घातला होता. या प्रकरणी अभिनेत्याकडून मुंबईच्या सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. आता आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्याला ६१. ८३ लाखांचा गंडा घालणाऱ्या गुन्हेगाराचं नाव ‘अक्षय कुमार’ आहे.

Athiya Shetty आणि KL Rahul ने शेअर केला मुलीचा पहिला फोटो, नावही केलं जाहीर; अर्थही आहे खास

मुंबईच्या सायबर क्राईम पोलिसांनी अक्षय कुमारला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर ऑनलाइन टास्कद्वारे कमाईचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चोरट्याने अभिनेत्याला तब्बल ६१. ८३ लाख चुना लावला आहे. ऑनलाइन टास्कद्वारे कमाईचे आमिष दाखवून या चोरट्यांनी लाखोंचा गंडा घातला आहे. या प्रकरणी अद्याप एकालाच अटक केलेली आहे. त्याच्यासोबत आणखी किती जणं आहेत, अद्याप ही माहिती तरी गुलदस्त्यातच आहे. अक्षय कुमार गोपलन असं सागर कारंडेची फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव असून आरोपीला सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे.

मिलिंद गवळींनी घेतलं सपत्नीक सिद्धीविनायकाचं दर्शन, पोस्ट शेअर करत सांगितला मंदिरातील खास अनुभव

पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगानं हलवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या नंतर त्याची कसून चौकशी केली. चौकशीअंती पोलिसांना आरोपीकडून, त्याने अभिनेत्याकडून क्रिप्टो करन्सी खरेदी करून उकळलेले सगळे पैसे खर्च केल्याचं समोर आलं आहे. आरोपीने फक्त सागर कारंडेकडूनच नाहीतर इतरही लोकांकडूनही आर्थिक फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सागर एका कार्यक्रमासाठी गेला असताना त्याने माध्यमांसोबत संवाद साधला होता. त्या संवादात त्याने, “मला ऑनलाईन फसवणुक प्रकरणावर काहीही बोलायचं नाही, ‘फेक आहे ते…’ त्याबद्दल नाही बोलायचं मला…”, “सागर कारंडे एकच नाहीये खूप आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं, तर तुम्हालाही खूप दिसतील. जाऊ देत ना त्यांचं काम आहे, ते करतात. मरू देत ना… आपण कशाला लक्ष द्यायचं, पण हे प्रकरण खोटं आहे, माझ्यासोबत असं काही झालेलं नाही.”, अशी प्रतिक्रिया दिली होती.

कोण आहे Emma Bakr? रॅपर हनी सिंगला करत आहे डेट; Video Viral…

नेमकं प्रकरण काय ?

इन्स्टाग्रामवर लाईक्सच्या बदल्यात १५० रुपयांचं आमिष दाखवून अभिनेत्याची फसवणूक करण्यात आली होती. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी अभिनेत्याच्या खात्यात २२ हजार रुपये देखील पाठवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अभिनेत्याच्या अकाऊंटमधून पैसे उकळण्यात आले होते. “इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा…” या प्रलोभनाला बळी पडलेल्या सागर कारंडेंची सायबर चोरट्यांनी तब्बल ६१ लाख ८३ रुपयांची फसवणूक केली होती. फेब्रुवारी महिन्यात सागरला एका अनोळखी व्हॉट्सअप नंबरवरून मेसेज आला होता. त्यामध्ये “इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा…” अशा पद्धतीच्या जाहिरातीची माहिती पाठवण्यात आली होती. तो अनोळखी व्हॉट्सअप नंबर एका महिलेचा होता. तिने त्या माध्यमातून अभिनेत्यासोबत संवाद साधला होता. टेलिग्रामसह अन्य सोशल मीडिया ॲपवरून पाठवण्यात येणाऱ्या इन्स्टाग्राम लिंकला लाईक करण्याचं काम तुम्हाला असल्याचं त्या महिलेने सागरला सांगितलं.

राज्य सरकारच्या व्ही शांताराम पुरस्कारांची घोषणा, महेश मांजरेकर, अनुपम खेर यांना पुरस्कार जाहीर; वाचा यादी

प्रत्येक लाइकला दीडशे रुपये दिले जातील, अशा प्रकारे घरबसल्या सहा हजार रुपये कमावता येतील, अशी ऑफर असल्याचं सागरला सांगण्यात आलं. फारसं काही कठीण काम नसल्याने या कामाला सागरने होकार दिला. सागरने ठरल्याप्रमाणे काम आपण सुरु केल्याचं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्याला त्या ऑफर अंतर्गत सुरुवातीला २७ लाख रुपये भरावे लागले होते. अभिनेत्याला हे पैसे कमिशन आणि मोबदला यासाठी वॉलेटवर जमा करायला सांगितले होते. शिवाय त्याचे पैसे कुठेही वापरले जाणार नाहीत, अशी ग्वाही सुद्धा दिली होती. त्यामुळे अभिनेत्याने हे पैसे भरले होते. त्यानंतर अभिनेत्याला ११ हजाराचं काम सुद्धा देण्यात आलं होतं. काही दिवसांनंतर सागरने त्याच्या वॉलेटमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला वॉलेटमधील पैसे काढू नये, टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील, असं त्याला सांगण्यात आलं होतं. शिवाय, १०० टक्के टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी काही रक्कम भरावी लागेल. असे म्हणत सायबर चोरट्यांनी अभिनेत्याला आणखीन १९ लाख रुपये आणि त्यावर ३०टक्के कर भरण्यास भाग पाडलं, अशा प्रकारे अभिनेत्याकडून त्या चोरट्यांनी ६१ लाख रुपये उकळले. ही घटना घडल्यानंतर अभिनेत्याला आपली फसवणूक झाल्याची बाब समोर आली. अभिनेत्याला त्या चोरट्यांनी तुम्ही भरलेला कर चुकीच्या अकाऊंटमध्ये गेला, असं सांगितलं. त्यामुळे तुम्हाला आणखीन पैसे गुंतवावे लागतील. पैसे मिळत नसल्याने अभिनेत्याला आपली फसवणूक झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्याने लगेच पोलिसांत धाव घेतली होती.

Web Title: Mumbai cyber cell arrests 26 year old man for duping marathi comedian sagar karande of 61 lakh in online task scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • cyber crime
  • Cyber ​​police
  • cyber scam
  • marathi actor
  • sagar karande
  • Television Shows

संबंधित बातम्या

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
1

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
3

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Mahanagar Gas : तुम्ही महानगर गॅसधारक आहात? तर, ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे..!
4

Mahanagar Gas : तुम्ही महानगर गॅसधारक आहात? तर, ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे..!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.