Evaarah The name of KL Rahul and Athiya Shetty's daughter
भारताचा स्टार क्रिकेटपटू के.एल.राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी आपल्या चाहत्यांसोबत काही दिवसांपूर्वीच गोड बातमी शेअर केली होती. २४ मार्चच्या दिवशी राहुल आणि आथिया आई- बाबा झाले. या लोकप्रिय कपलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर करत कन्यारत्न प्राप्ती झाल्याची माहिती दिली होती. आई-बाबा झाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात झाली होती. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा केएल राहुल पहिली मॅच सोडून आथियाने बाळाला जन्म देताना सोबत होता. आता या जोडीने त्यांच्या लेकीचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे.
मिलिंद गवळींनी घेतलं सपत्नीक सिद्धीविनायकाचं दर्शन, पोस्ट शेअर करत सांगितला मंदिरातील खास अनुभव
काही तासांपूर्वीच के.एल.राहुलने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या लेकीचं नाव सांगितलं असून तिची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. के.एल.राहुल आणि आथियाच्या लेकीचं नाव, Evaarah (इवारा) असं ठेवलंय. पोस्ट शेअर करताना क्रिकेटरने लिहिलंय की, “आमची गोंडस लेक, आमचं सर्वस्व Evaarah/ इवारा देवाने दिलेलं सुंदर गिफ्ट…” क्रिकेटरने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. के.एल.राहुलच्या कडेवर मुलगी असून आथिया आपल्या लेकीचं कौतुक करताना दिसते. फोटोमध्ये राहुल आणि आथिया हे दोघंही प्रेमाने बघत आहेत.
कोण आहे Emma Bakr? रॅपर हनी सिंगला करत आहे डेट; Video Viral…
अथिया आणि के.एल.राहुलने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांसह कलाकारांकडूनही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, समांथा रूथ प्रभू, ईशा गुप्ता आणि सुनील शेट्टी यांनी या पोस्टवर कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला आहे. रॅपर बादशाह, अक्षर पटेल, केव्हिन पिटर्सन, सुर्यकुमार यादवची पत्नी देवीशा शेट्टी, क्रिकेट टीम दिल्ली कॅपिटलनेही अथिया आणि के.एल.राहुलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांना अथिया आणि के.एल.राहुल यांनी त्यांच्या मुलीसाठी जे नाव निवडलं ते आवडलं असून कौतुक केलं आहे.
लग्नाला दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच आथिया- राहुलने सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. डेटिंग केल्यानंतर काही वर्षांतच त्यांनी आपल्या नात्याला नवा टॅग देण्याचा निर्णय घेतला. आथिया आणि राहुलने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच, २३ जानेवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. या कपलचं लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर पार पडलं होतं. या लग्नाला फक्त दोघांचेही कुटुंबीय आणि क्रिकेटविश्वातील शिवाय फिल्म सिनेइंडस्ट्रीतीलही काही मोजकेच लोकं उपस्थित होते.