बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bacchan) यांचा काल विना हेल्मेट दुचाकीवरुन प्रवास करतानाचा फोटो दिवसभर सोशल मिडियावर फिरत होता. त्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने बिग बी पासुन प्रेरणा घेत दुचाकी वरुन प्रवास केला. मात्र, यावेळी तीनेही हेल्मेट न घातल्याच नेटकऱ्यांच्या लक्षात आल्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येत आहे. या प्रकरणाची आता मुंबई पोलिसांनी दखल घेतली असून अमिताभ बच्चन आणी अनुष्का शर्मावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिस ही कारवाई करणार आहेत.
[read_also content=”डोळ्यासमोर अख्खं कुटुंब संपलं! वडील आणि धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलानं घेतलं विष, हे पाहून आईला हृदयविकाराचा झटका https://www.navarashtra.com/crime/son-commit-suicide-after-the-death-of-his-father-and-younger-brother-the-mother-suffered-a-heart-attack-nrps-399970.html”]
काल अमिताभ बच्चन यांनी शुटींग सेटवर जाण्यासाठी अनोखळी व्यक्तीकडून लिफ्ट घेतली होती. तर अनुष्का शर्मालाही तिच्या अंगरक्षकासह दुचाकीवरु प्रवास करताना पाहण्यात आले. या दोन्ही घटनांमध्ये कोणीही हेल्मेट घातले नव्हते.दरम्यान, सोशल मिडियावर त्यांना ट्रोल करण्यात आल्याबरोबत कारवाई होणार का असा सवाल मुंबई पोलिसांना विचारला जात होता. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांना ट्विट केले. यावर काही युझर्सनी प्रतिक्रिया देताना मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यावर भर दिला असल्याचे सांगितले.
अमिताभ बच्चन बाइकवरून शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले खरं तर, 80 वर्षीय मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या मुंबईत त्यांच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. अशा परिस्थितीत ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी आणि विलंब न लावता शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याने एका अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागितली आणि नंतर बाइकने लोकेशन गाठले. त्याला कामावर घेऊन गेलेल्या व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. फोटो शेअर करून त्याने मजेशीरपणे लिहिले- ‘थँक्स मित्रा, राईडसाठी. मी तुम्हाला ओळखत नाही, पण तुम्ही मला लिफ्ट दिली आणि वेळेवर माझ्या ठिकाणी पोहोचला. आम्हाला ट्रॅफिक जामपासून वाचवल्याबद्दल धन्यवाद.