आजच्या घडीला अनेक चित्रपट कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील, वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात त्यांच्या या कलागुणांचा गौरव करणारा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा पहिलावहिला ‘नवराष्ट्र प्लॅनेट मराठी फिल्म ॲन्ड ओटीटी अवॉर्ड’ सोहळा ४ मे रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून ‘नवराष्ट्र -प्लॅनेट मराठी फिल्म अँड ओटीटी अवॉर्ड’ या सोहळ्याची सगळे जण आतुरतेने वाट बघत होते. पुरस्कार कोण पटकावणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती.
या सोहळ्याला अनेक फिल्मी सिनेतारकांनी, राजकीय नेत्यांनी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कलाकारांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पुष्कर श्रोत्री आणि संदीप पाठक यांच्या प्रसिद्ध जोडीने सुत्र संचालनाची धुरा सांभाळली.
अभिनेत्री आदिती द्रवीडच्या सुंदर नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्लॅनेट मराठी आणि नवराष्ट्रचे संजय तिवारी यांनी कार्यक्रमाचे थोडक्यात नियोजन सांगितले. नवराष्ट्र आणि प्लॅनेट मराठी यांच्या कारकिर्दीचा एक छोटा व्हिडिओही यावेळी सादर करण्यात आला.
या अनोख्या सोहळ्याला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील नामवंत दिग्दर्शक महेश कोठारे, महेश मांजरेकर, केदार शिंदे, प्रवीण तरडे, निखिल महाजन यांनी हजेरी लावली होती तसेच प्रिया बापट,उमेश कामत, जितेंद्र जोशी, विरासज कुलकर्णी, आशय कुलकर्णी, आदिनाथ कोठारे, अंकुश चौधरी, मेघा धाडे, स्मिता गोंदकर, अविनाश नारकर, गौरी नलावडे, मृणाल कुलकर्णी,किरण गायकवाड, समीर चौघुले, क्रांती रेडकर, आर्या आंबेकर हेदेखील या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सर्व कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावून जणू चार चांद लावले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या नृत्याने प्रेक्षकांना मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणीचे दर्शन झाले.
विजेत्यांची नावे