शीला-जीतच्या आत दडलंय 'सुशीला- सुजीत', स्वप्नील जोशीच्या नव्या चित्रपटाची होतेय चर्चा
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक ही मराठी चित्रपटसृष्टीतील दोन महत्वाची नावं आहे. दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचा प्रेक्षकवर्ग नेहमीपासूनच चाहता राहिला आहे. एकीकडे जिथे स्वप्नील नवनव्या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो तर दुसरीकडे प्रसाद ओक आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर कच्चा लिंबू, चंद्रमुखी, आणि हिरकणी सारखे चित्रपट सादर करतो. परंतु कधीही या दोन्ही कलाकारांनी एकाच चित्रपटात काम केलेले नाही. त्यामुळे अर्थातच त्यांच्या फॅन्सना त्यांना एकत्र पाहण्याचे स्वप्न भंग पावत होते. पण तसे होणार नाही!
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे लवकरच एकत्रितपणे काम करताना दिसणार आहेत. या नव्या चित्रपटात स्वप्नील जोशी एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार असून, प्रसाद ओक दिग्दर्शनाची जबाबदारी पार पडणार आहेत. विशेष म्हणजे स्वप्नील जोशी या चित्रपटात निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका साकारणार आहेत. त्याच्या या दुहेरी भूमिकेचा चित्रपटाच्या निर्मितीवर मोठा प्रभाव पडेल, हे निश्चित आहे.
या चित्रपटाचे नाव “सुशीला- सुजीत” असे ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे त्याची कथा आणि विषय कदाचित प्रेक्षकांच्या मनात विविध विचार निर्माण करू शकतात. हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि त्याच्या प्रमोशननंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिखरावर असण्याची शक्यता आहे.
वर्ष संपत आलं पण स्वप्नील जोशी जोरदार बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स करताना दिसतोय. येणाऱ्या वर्षात स्वप्नील अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे आणि त्यातला एक सिनेमा म्हणजे सुशीला- सुजीत. या चित्रपटात स्वप्नील चित्रपटाची निर्मिती आणि अभिनय अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या घोषणे नंतर सोशल मीडिया वर अनेक चर्चा रंगल्या होत्या आणि आता प्रेक्षकांना एकदाची या चित्रपटाची रिलीज डेट समजली आहे.
स्वप्नील ने सोशल मीडिया वरून सुशीला- सुजीत चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली असून १८ एप्रिल २०२५ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशीला- सुजीत मध्ये स्वप्नील आणि सोनाली कुलकर्णी पहिल्यांदा एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत.
सुशीला- सुजीत हा विषय नक्की काय आहे ? अजुन कोण कलाकार यात दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे पण हा चित्रपट नक्कीच काहीतरी कमालीचा विषय घेऊन येईल यात शंका नाही! वर्ष संपताना स्वप्नील आपल्या प्रेक्षकांना एका हून अधिक गूड न्यूज देताना दिसतोय आणि म्हणून या वर्षासारखं २०२५ देखील त्याच्यासाठी व त्याच्या खास फॅन्ससाठी स्पेशल ठरणार आहे.