"ज्या प्रकारे विशाल बोलतोय ना मला...", अखेर तन्वीने विशालबाबत आयुषसामोर मांडली स्पष्ट भूमिका
तन्वी आयुषशी बोलताना म्हणते की, विशाल ज्या पद्धतीने बोलतो आहे त्यामुळे तिला त्या ग्रुपमध्ये बसण्याचीही इच्छा उरलेली नाही. ती सांगते की, जसं दक्षिण भारतात लोक प्रभू देवाला मानतात, तसंच मराठी इंडस्ट्रीत राकेश दादांना मान दिला जातो. मात्र, याच उदाहरणावरून विशालने आक्षेप घेत राकेशविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने तन्वीला तीव्र नाराजी वाटली.
बिग बींच्या घरात टॉयलेट सोन्याचा! सोशल मीडियावर चर्चेत अमिताभ बच्चन यांच्या घरातील कमोड
तन्वीच्या मते, “तू त्यांना मानत नसशील, पण मी मानते. माझ्यासाठी ते देवासारखे आहेत,” असे स्पष्ट सांगूनही विशालने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशालचे म्हणणे होते की राकेश दादांना उगाचच देवत्व दिले जात आहे आणि त्यांच्याविरोधात स्टँड घ्यायला हवा. तन्वीचा आरोप आहे की, विशाल मुद्दाम मुलींचा वापर करून राकेश दादांविरोधात वातावरण तयार करत आहे आणि त्याचा एकच उद्देश आहे—राकेश दादांना खाली खेचणे.
“Pushpa 3 मध्ये Salman Khanची एन्ट्री, Allu Arju च्या चित्रपटात काय असेल भाईजानचा रोल? वाचा सविस्तर
“हळूहळू मला त्याचा गेम समजू लागलाय,” असे म्हणत तन्वीने विशालच्या रणनीतीवर थेट बोट ठेवले. या संवादानंतर घरात पुढे आणखी कोणते वाद, चर्चा आणि डावपेच रंगणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






