बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) डान्सचे अनेक चाहते आहेत. नोरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. नोरा फतेहीचा डान्स (Nora Fatehi Lavani) करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत नोरा लावणी करताना दिसत आहे.
सध्या नोरा फतेही ही डान्स दिवाने ज्युनियर (Dance Deewane Juniors) या शोची परिक्षक म्हणून काम करत आहे. मात्र या शोमधील नोरा फतेहीने स्वत:च्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात नोरा ही ‘सात संमदर पार’ या गाण्यावर लावणी करताना दिसत आहे. नोरासोबत गीत कौर बग्गा आणि कॅप्टन सोनाली कार या दोघीही लावणीवर नाचताना दिसत आहेत.
[read_also content=”राज्यसभेची सहावी जागा आणि छत्रपती संभाजीराजेंबद्दल संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-reaction-about-rajyasabha-election-and-chhatrapati-sambhajiraje-statement-nrsr-285456/”]
नोरा फतेहीने या दृश्याच्या पडद्यामागचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नोरा फतेहीने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. याला कॅप्शन देताना तो म्हणाला, “माझ्या ज्युनियर्ससोबत स्टेजवर डान्स करताना खूप मजा आली. यावेळी मी लावणीचा प्रयत्न केला. सोनाली आणि गीत या दोघीही अप्रतिम डान्सर आहेत. या व्हिडिओच्या मागे तुम्ही जी कमेंट्री एकत आहात, ती देखील मला फार आवडली.”