(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
चित्रपटाची पहिली झलक १९ मेच्या मध्यरात्री प्रदर्शित होणार असून, ती २० मे रोजी एनटीआरच्या वाढदिवसाशीही जोडलेली आहे. याचदरम्यान निर्मात्यांनी एक नवे छायाचित्र प्रदर्शित करून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असल्याने, निर्मात्यांनी चित्रीकरणाच्या ठिकाणाहून एक फोटो शेअर करत चाहत्यांना ‘रिकाम्या जागा भरा’ असा प्रश्न विचारून उत्सुकता वाढवली आहे. १९ मेच्या मध्यरात्री होणाऱ्या मोठ्या झलक प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी एक छायाचित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये वाळवंटात एक व्यक्ती हातात काठी घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. या छायाचित्रामुळे पुढे काय पाहायला मिळणार याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे. की “वादळापूर्वीची ____ रिकाम्या जागेत काय येणार आहे, हे तुम्हाला माहितीच आहे.” असं म्हणत #एनटीआरनील #प्रशांतनील सारखे हॅशटॅग दिले आहेत.
चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू असून, चाहत्यांना प्रत्येक नव्या घडामोडीची आतुरता लागली आहे. दोन मोठ्या ताकदीची नावे एकत्र आल्यामुळे एनटीआरनील हा सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक बनला आहे आणि हा भव्य संगम मोठ्या पडद्यावर काय कमाल करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. Prashanth Neel यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या एनटीआरनीलमध्ये N. T. Rama Rao Jr. मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट Mythri Movie Makers आणि NTR Arts यांच्या बॅनरखाली तयार केला जात आहे.






