साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाचा लायगर (Liger Poster) चित्रपटातील नवीन लूक समोर आला आहे. निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि विजय देवरकोंडाने (Vijay Deverkonda) सोशल मिडियावर त्याच नवं पोस्टर शेयर केलं आहे. या भन्नाट पोस्टरने इटंरनेटवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
विजय देवरकोंडाने हटके असं न्यूड पोस्टर शेयर केलं आहे. पोस्टरमध्ये विजय न्यूड उभा असून, त्याने हातात गुलाबाचा पुष्पगुच्छ धरला आहे. करण जोहरने हे पोस्टर शेअर करताना हटके कॅप्शन लिहिले आहे. ‘रोज रोज ऐसे गिफ्ट नही मिलते’, असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
[read_also content=”आशिष शेलारांची एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खाआशिष शेलारांची एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याविरोधात उच्च न्यायालयात याचिकात्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका https://www.navarashtra.com/maharashtra/ashish-shelar-petition-in-the-high-court-against-eknath-shinde-urban-development-department-299704.html”]
दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनेक रोमांचक पैलू दिसणार आहेत. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवराकोंडा पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. निर्मात्यांनी मुंबई, अमेरिका, लॉस वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्व भाषांमध्ये जगभरातील सिनेमाघरांमध्ये दाखल होईल.
[read_also content=”महाडमध्ये तळीये पुनरावृत्तीची भीती; बावळे गावाच्या डोंगराला भेगा https://www.navarashtra.com/maharashtra/divide-the-hills-of-bavale-village-fear-of-recurrence-of-ponds-in-mahad-nrgm-299725.html”]






