(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
देशभरात आजपासून (२२ सप्टेंबर) नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्र आनंदमय आणि भक्तिमय वातावरण आहे. या निमित्ताने अनेक मराठी सेलिब्रिटींनी पारंपरिक लूकमध्ये फोटो शेअर करत सोशल मीडियावर नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेषतः पांढऱ्या शुभ्र साड्यांमधील सौंदर्यवतींचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
अशातच अभिनेत्री पूजा सावंत हिनेही एक खास पोस्ट शेअर केली असून नवरात्रीशी निगडित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पूजाने देवीच्या मंदिरातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला तिने छान कॅप्शन दिले आहे, तर यावेळी ती मुंबईबाहेर असल्याने घटस्थापनेच्या दिवशी घरी नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
स्पायडर-मॅनच्या शूटिंगदरम्यान टॉम हॉलंडला दुखापत; चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं!
पोस्टमध्ये काय म्हणाली पुजा सावंत
पुजा सावंतने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, यात ती म्हणाली, ”घटस्थापनेला मी घरी नसण्याची ही पहिलीच वेळ आहे.कामानिमित्त मुंबईबाहेर शुटिंग करतेय, आज पहिल्यांदा देवीची स्थापना माझ्या डोळ्यादेखत नाही झाली .. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं .. पण शेवटी ती आईच .. तिचं लक्ष तिच्या बाळांवर नेहमी असतं.. एका वेगळ्या रूपात तिंच आज दर्शन झालं जय जगदंब! सर्वांना नवरात्रौत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा.” असं कॅप्शन देत पुजा सावंतने इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे.
पूजा सावंत मुंबईबाहेर सोनाई या ठिकाणी शूटिंग करत आहे. याबद्दल तिने शेअर केलेल्या पोस्टमधून पाहायला मिळत आहे. अभिनेत्री पूजा सावंत नेहमी तिच्या कुटुंबासोबत सगळे सण साजरे करत असते, याबद्दल ती नेहमी सोशल मीडियावर देखील फोटो शेअर करताना दिसते. अभिनेत्री सध्या तिच्या आगामी कपबशी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता ऋषी मनोहर या आगामी चित्रपटात दिसणार आहे.