(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय स्पायडर-मॅन अभिनेता टॉम हॉलंड याला आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर दुखापत झाली आहे. या अपघातामुळे ‘Spider-Man: Brand New Day’ या बहुचर्चित चित्रपटाचं शूटिंग सध्या थांबवण्यात आलं आहे. The Sun च्या माहितीनुसार, हा अपघात एका स्टंट सीन दरम्यान झाला आहे. टॉमने जरी अनेक धोकादायक स्टंट्स स्वतः केले असले, तरी यावेळी एका स्टंटमध्ये गडबड झाल्याने त्याला काही काळासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, दुखापत गंभीर नसून तो लवकरच शूटिंगला परतेल, असं त्याच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.
Drishyam 3: साऊथ स्टार मोहनलाल ‘दृश्यम 3’ साठी सज्ज, शूटिंग सुरु करण्याआधी घेतले देवाचे आशीर्वाद
स्पायडर मॅन ब्रॅंड न्यू डे ३१ जुलै, २०२६ रोजी रिलीज होणार होता. स्पायडर मॅन ब्रॅंड न्यू डे हा मार्वल कॉमिक्स पात्र स्पायडर -मॅनवर आधारित असून एक आगामी अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे. स्पायडर मॅन नो वे होन २०२१ मध्ये रिलीज झाला होता. स्पायडर मॅन सिरीजच्या मागील चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवले होते. त्यामुळे या नव्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. टॉम हॉलंडच्या दुखापतीमुळे चित्रपटाच्या वेळापत्रकावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता असली तरी, प्रेक्षकांची उत्सुकता मात्र कमी झालेली नाही.जगभरातील स्पायडर-मॅन चाहत्यांना “Brand New Day” या नव्या पर्वाची आतुरतेने प्रतीक्षा आहे.
Swami Samarth: स्वामींच्या दिव्य शक्तींचा जागर, ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवरात्र विशेष भाग!
टॉम हॉलंडच्या दुखापतीमुळे ‘Spider-Man Brand New Day’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला थोडासा उशीर होऊ शकतो, पण सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाचं आहे त्यांचं पूर्णपणे बरे होणं आणि आरोग्याची काळजी घेणं. हॉलंडला लवकरच पुन्हा सेटवर बोलावणं म्हणजे त्याच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, आणि त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शक मंडळी कोणताही घाईत निर्णय घेणार नाहीत.
हॉलंड जबरदस्त एनर्जी, अभिनय आणि स्टंट्ससाठी ओळखला जातो. त्यामुळे जेव्हा तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतेल, तेव्हा त्याचा परफॉर्मन्स आणि चित्रपटाचा अनुभवही प्रेक्षकांच्या अपेक्षांवर नक्कीच खरा उतरेल.