बाप- लेकाच्या नात्यावरील 'श्री गणेशा' चित्रपटावर प्रथमेश परबच्या बायकोची खास पोस्ट; म्हणाली, "हसवता हसवता रडवलं..."
प्रथमेश परब आणि शशांक शेंडे स्टारर ‘श्री गणेशा’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हास्य-विनोद, धमाल-मस्ती, नाट्यमय घडामोडी, रोमान्स आणि इमोशन्सची रोलर कोस्टर राईड असलेला ‘श्री गणेशा’ चित्रपट २० डिसेंबरला रिलीज झाला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून कलाकारांच्या अभिनयाची जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नुकताच प्रथमेशच्या बायकोने म्हणजेच क्षितीजा घोसाळकरने ‘श्री गणेशा’ चित्रपट पाहिला. तिने चित्रपट पाहिल्यानंतर प्रथमेश परबसह सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
सोनी बीबीसी अर्थ ख्रिसमसला उलगडणार स्वादिष्ट गुपिते; रिलीज करणार अप्रतिम मालिका!
नुकताच क्षितीजा घोसाळकर परबने ‘श्री गणेशा’ चित्रपट पाहिला. तिने चित्रपट पाहिल्यानंतर खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये क्षितीजा घोसाळकर परब म्हणते,
“काल ‘श्री गणेशा’ चित्रपट पाहिला. चित्रपट संपल्यानंतर खूप वेळ कळत नव्हतं की काय आणि कसं React करावं. खूप कमी वेळा आपण निःशब्द होतो. काल तेच झालं. वडील आणि मुलाच्या नात्याचं अजून सुंदर वर्णन काय बरं असु शकतं. सुंदर कथा, अप्रतिम लोकेशन्स, absolutey apt performances, सतत गुणगुणत रहावी अशी गाणी. चित्रपट पाहून अवघा १ दिवस उलटून गेला परंतु अजूनही मन मात्र चित्रपटगृहातच आहे. मिलिंद सर..”The Best Film” एकदम टकाटक… मेघा जितकी गोड दिसली आहेस तितकंच गोड कामही केलेस… मानसी sorry… मधुबाला जीव ओतून नाचली आहेस, मला जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तेव्हा हे गाणं मी आवर्जून बघतेच… संजय सर आणि शशांक सर अभिनयाच्या दोन युनव्हर्सिटी म्हणू शकतो आपण. तुम्हाला स्क्रीन वर बघणं, म्हणजे खरंच एक ट्रीट आहे. आणि आता थोडंसं माझ्या नवऱ्याबद्दल… तुझा ह्या चित्रपटाबद्दल मला कौतुक करायला खरंच शब्द सुचत नाहीत. ज्या पद्धतीने तू टिकल्या साकारला आहेस त्याला तोड नाही. नेहमी खळखळून हसवतोस, काल हसवता हसवता रडवलस रे…विनोदी व्यक्तिरेखे व्यतिरिक्त देखील अशा प्रकारच्या भूमिका तू किती उत्तम साकारू शकतोस हे तू “टिकल्या”च्या रुपात दाखवून दिलंस… मला खूप अभिमान वाटतोय तुझा. नेहमी प्रमाणेच आय लव्ह यू… चित्रपटगृहाबाहेर आल्यावर पहिला फोन बाबांना केला. “काय गं ताई, एवढ्या रात्री फोन केलास, बरी आहेस ना? समोरून काळजीचा स्वर आला.” “हो बाबा, एवढंच सांगायचं होत, की तुम्ही जगातले best बाबा आहात”, पाणावलेल्या डोळ्यांनी मी म्हटलं. क्षणभर थांबून आमचं पुढचं conversation पुढे सुरू राहील. वडील आणि मुलाच्या नात्याची धमाल roller coster ride तुम्हीही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की अनुभवा…”
‘संगी’तून पाहायला मिळणार मित्रांची धमाल मस्ती… चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज
अशी पोस्ट प्रथमेश परबच्या बायोकने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टवर मेघा शिंदे आणि शशांक शेंडेनी कमेंट करत तिचे आभार मानले आहेत. ‘श्री गणेशा’ धमाल रोड ट्रीपचा आणि ‘श्री गणेशा’ फॅमिली एंटरटेनमेंटचा’ असे म्हणत एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रस्तुत केलेला ‘श्री गणेशा’ चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली असून, लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केले आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत शशांक शेंडे, संजय नार्वेकर, प्रथमेश परब आणि मेघा शिंदे आहेत. रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांची असून, पटकथा संजय नवगिरे यांच्या साथीने लिहिली आहे. संवाद लेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. सदानंद उर्फ टिकल्या आणि भाऊसाहेब पाटील यांच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.