Ranbir Kapoor Alia Bhatt Krishna Raj bungalow finally ready for move 250 crore House registered to daughter Raha Name
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बी- टाऊनमधील आघाडीच्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. या सेलिब्रिटी कपलने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. यांना राहा नावाची क्यूट लेकही आहे. राहा कायमच आपल्या आई- वडिलांसोबतच ती सुद्धा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सध्या कपूर फॅमिली त्यांच्या नव्या घरामुळे चर्चेत आलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या नव्या घराची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रणवीर- आलियाच्या वांद्रातील घराचे बांधकाम सुरु होतं. आता ते पूर्ण झालं असून सध्या सोशल मीडियावर रणबीर- आलियाच्या घराचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहे.
Masaba Gupta पुन्हा एकदा देणार ‘गुडन्यूज’? व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी बुचकळ्यात
रणबीर- आलियाच्या वांद्रातील घराच्या व्हिडिओ अनेकदा व्हायरल झालेले आहेत. जेव्हापासून त्यांच्या घराच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे, तेव्हापासून अनेकदा व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत. आता त्यांच्या घराचे संपूर्ण बांधकाम शेवटच्या टप्प्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर- आलियाच्या घराचे काम २०२४ मध्ये पूर्ण झाले होते, सध्या त्यांच्या संपूर्ण घरावर टच-अपचं काम सुरु आहे. त्यांच्या बंगल्याचं काम यावर्षीच पूर्ण होणार आहे. आलिया- रणबीरच्या घराचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये त्यांचे घर खूपच सुंदर दिसत आहे. रणबीर आणि आलियाचे हे घर त्यांचे आजोबा राज कपूर यांचे होते.
कमल हसन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, धमक्यांपासून संरक्षणाच्या मागणीला दिला नकार
मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर- आलियाच्या ह्या घराची किंमत २५० कोटी रुपये इतके आहे. सहा मजल्यांचा हा बंगला असून या बंगल्याच्या प्रत्येक बालकनीत झाडेदेखील पाहायला मिळेल. तसेच घराभोवती कुंपणदेखील बांधले आहे. मात्र गेटऐवजी एक पत्रा दिसत आहे. रणबीर-आलियाचे हे घर आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. २०२४ पेक्षा आता हे घर अधिक आकर्षक आणि अधिक परिपूर्ण दिसत आहे. रणबीर-आलिया त्यांच्या सुरक्षेबद्दल खूप सावध आहेत आणि विशेषतः राहाच्या सुरक्षेचा विचार केला तर घरात त्यानुसार व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल मीडियावर रणबीर-आलियाच्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल भयानी या चॅनेलने शेअर केला आहे.
रणबीर-आलियाचा हा बंगला पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तर नेहमीप्रमाणे काहींनी त्यांना ट्रोल सुद्धा केलं आहे. रणबीर-आलियाचं घर खूपच खास दिसत असून या सर्वात मात्र, नेटकऱ्यांना गेट का बदलला नाही ? असा प्रश्न पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “इतका खर्च झाला की नवीन गेट लावण्यासाठी पैसेच उरले नाहीत”, तर आणखी एक युजरने लिहिले की, “रणवीर म्हणत असेल मी गेट नाही बदलणार”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “गेटसाठी थोडे पैसे खर्च केले असते, तर बरं झालं असतं”, एका नेटकऱ्याने लिहिले, “पत्र्यांचं इतकं स्वस्त गेट का बनवलं?”, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अनेकदा त्यांच्या घराचं बांधकाम कसं सुरु आहे ? याची पाहणी करण्यासाठी ते अनेकदा जायचे. लेक राहा सुद्धा त्यांच्यासोबत अनेकदा घराचं बांधकाम पाहण्यासाठी गेली आहे. रणबीर कपूरसोबत त्याची आई नीतू कपूर देखील घरातील कामे पाहण्यासाठी गेली आहे. आता चाहते त्यांच्या घराची आतून झलक पाहण्यास उत्सुक आहेत.