Sikandar Movie Rashmika Mandanna In Stress While Movie Release In Eid Salman Khan
सध्या सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना ‘सिकंदर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ए.आर.मुरगोदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्चला रिलीज होणार आहे. दोघंही सेलिब्रिटी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून दोघंही मुलाखती देताना दिसत आहे. सध्या रश्मिका तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ‘सिकंदर’च्या रिलीजआधी रश्मिकाने मोठं वक्तव्य केलंय, ज्यामुळे सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे. काय म्हणाली रश्मिका? जाणून घेऊया…
‘चल जाऊ डेटवर’, समीर चौघुले सई ताम्हणकरला म्हणतो…
सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना ‘सिकंदर’ चित्रपटासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. पहिल्यांदाच सलमान आणि रश्मिका एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. ‘सिकंदर’ प्रदर्शित होण्यापूर्वी, प्रेक्षकांचा उत्साह कायम राहण्यासाठी सोशल मीडियावर चित्रपटासंबंधित बरीच माहिती समोर येत आहे. 123 डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सिकंदर’ चित्रपटातील रश्मिकाचा अभिनय पाहून चाहते कसा प्रतिसाद देतात, ती हे पाहण्यासाठी आतुर आहे.
आणखी एक ‘टोरेस’ कांड! श्रेयस तळपदे पुन्हा एकदा अडकला कायदेशीर अडचणीत, नेमकं काय प्रकरण!
‘सिकंदर’च्या रिलीजआधी रश्मिका म्हणाली की, “यापूर्वी मी कोणत्याही चित्रपटाच्या रिलीजपूर्वी इतकी टेंशनमध्ये नव्हते. पण यावेळी जरा टेंशन आहे. ही सलमान खानची फिल्म आहे आणि हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. इतक्या मोठ्या चित्रपटाला प्रेक्षक कसे स्वीकारतात आणि प्रेक्षकांना माझा अभिनय आवडतो का ? हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.” अशाप्रकारे रश्मिका मंदानाने ‘सिकंदर’च्या रिलीजआधी ती किती टेंशनमध्ये आहे, याचा खुलासा सर्वांसमोर केलाय.
‘मी पाठीशी आहे’ चित्रपटाच्या प्रदर्शनात विलंब; अमेय खोपकर यांची स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची मागणी
ए. आर. मुरुगोदॉस दिग्दर्शित आणि सलमान खान- रश्मिका मंदान्ना स्टारर ‘सिकंदर’ चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. ईदच्या आदल्या दिवशी हा चित्रपट जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान खान चित्रपटात कोणती भूमिका साकारणार ? हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. ‘सिकंदर’मध्ये सलमान खानसोबत रश्मिका मंदान, काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, सत्यराज हे कलाकार दिसणार आहे.