इंडियाज गॉट..च्या स्पर्धकाला मिळणार रोहित शेट्टीच्या चित्रपटाला संगीत देण्याची संधी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये अलिकडेच दिग्दर्शक रोहित शेट्टीने हजेरी लावली. यावेळी रोहितला या शोमधील स्पर्धक दिव्यांश आणि मनुराजचं टॅलेंट खूपच भावलं. त्यामुळे रोहितने त्या दोघांना त्याच्या आगामी सिनेमाचं संगीत देण्याची संधी दिली आहे. अनेक रिऍलिटी शोमधील स्पर्धकांना बॉलिवूडची दारं आपसूकपणे खुली होतात. या स्पर्धकांमधली प्रतिभा मोठ मोठे दिग्दर्शक निर्माता या शोमधून अचूक हेरतात. अनेक दिग्गजांना या शोमध्ये गेस्ट म्हणून बोलवण्यात येतं. यावेळी स्पर्धक देखील आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयास करतात आणि असंच काहीसं इंडियाज गॉट टॅलेंटच्या मंचावर यावेळी झालं. रोहित शेट्टीने या शोमध्ये हजेरी लावली. बॉलिवूडचा हा ‘सिंघम’ येणार आहे म्हटल्यावर स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहचला होता. रोहितने देखील या शो यावेळी खूपच एन्जॉय केला आणि खास करुन दिव्यांश आणि मनुराजचं टॅलेंटने तो खूपच प्रभावीत झाला. त्याने भर कार्यक्रमात या दोघाचं तोंड भरून कौतुक केलं. रोहित शेट्टी म्हणाला की, असं गाणं आजपर्यंत ऐकलं नाही. तुम्ही खूपच टॅलेंटेड आहात. त्यानंतर तो या दोघांना त्याच्या आगामी ‘सर्कस’ चित्रपटासाठी संगीत देण्याचीसंधी देत असल्याचं जाहीर करतो. याबाबतचा एक व्हिडिओ रोहितने त्याच्या इन्स्टाग्रामवरदेखील शेअर केला आहे. |