सैफ अली खान हल्ला प्रकरणातील अपडेट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहे. १५ जानेवारीच्या रात्री सैफ अली खानवर त्याच्या घरात हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुल इस्लाम शहजादला अटक केल्यानंतर, त्याला आता २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या मते, या प्रकरणात एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग असू शकतो. बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर आरोपी शरीफुल इस्लाम काही दिवसांपासून कोलकातामध्ये राहत होता. आरोपीला सिम कार्ड देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात पोलिस पश्चिम बंगालमध्ये पोहोचले असल्याचे आता समोर आले आहे
सैफ अली खान हल्ला प्रकरण; आरोपीच्या पोलीस कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ; कोर्टाचा निर्णय
संशयिताच्या शोधात पश्चिम बंगालमध्ये
या प्रकरणातील दुसऱ्या संशयिताच्या शोधात मुंबई पोलिस पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. आरोपींना सिम कार्ड देणाऱ्या खुखमोनी जहांगीर शेखचा पोलिस शोध घेत आहेत. तसंच आता यामध्ये अजून एक ट्विस्ट आल्याचेही सांगण्यात येत आहे. मिड डे मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आता आरोपीचे फिंगरप्रिंट मॅच होत नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
आरोपींबद्दल नवीन खुलासा
पोलिस तपासात आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. त्यानुसार, आरोपी शरीफुल इस्लामसह इतर काही आरोपींची उपस्थिती असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस तपासात व्यस्त आहेत. आता नवीन अपडेट अशी आहे की पोलिसांना संशय आहे की आरोपी शरीफुलचा आणखी एक साथीदार असू शकतो.
५० हून अधिक बोटांचे ठसे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सैफच्या घरातून ५० हून अधिक फिंगरप्रिंटचे नमुने घेतले आहेत आणि ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तथापि, आरोपींचे बोटांचे ठसे जुळले की नाही याबद्दल पोलिसांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही. सीबीआयच्या शोधात मात्र आता हे ठसे शरीफुलचे नाहीत तर अन्य कोणाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला रोज वेगवेगळे वळण लागत आहे.
त्या रात्री सैफच्या घरी काय घडले?
या प्रकरणी सैफच्या स्टाफ नर्सने पोलिसात एफआयआर दाखल केला होता. त्यानुसार, एका अज्ञात व्यक्तीने सैफचा धाकटा मुलगा जेह याच्या खोलीत प्रवेश केला आणि अलियामावर हल्ला केला, ज्यामुळे त्याच्या बोटाला दुखापत झाली.
यानंतर, ओरड ऐकून तिथे पोहोचलेल्या सैफ आणि हल्लेखोर यांच्यात झालेल्या झटापटीत हल्लेखोराने सैफ अली खानवर चाकूने अनेक वार केले. यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेला. आणि सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता सैफला सोडण्यात आले आहे आणि आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे.