सैफवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोर वर्सोवामध्ये शूज चोरत होता, संशयिताचे नवीन CCTV फुटेज समोर...
अभिनेता सैफ अली खानच्या घरात १६ जानेवारीला एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर अभिनेत्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. आता त्याची प्रकृती बरी असून आयसीयूमधून स्पेशल रूममध्येही शिफ्ट करण्यात आले. अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिस सतर्क असून सतर्कतेने तपास करत आहेत. हल्लेखोर अद्याप पकडला गेला नसून पोलिसांनी त्याच्यासाठी मुंबईसह परिसरात ३५ टीम तैनात केल्या आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे, ज्यामध्ये सैफच्या हल्लाप्रकरणातील संशयित वर्सोवामध्ये एका घरातील शूज रॅकमधून शूज आणि चप्पल चोरून शूज चोरताना दिसत आहे.
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीची करीनाने केली नाही पर्वा; ऑटो चालक म्हणाला – ‘पैशांचा विचार…’
१६ जानेवारीला पहाटे अडीच वाजता हल्लेखोराने सैफच्या घरात घुसून अभिनेत्यावर धारदार चाकूने सहा वार केले होते. यामध्ये सैफला २ खोलवर गंभीर जखमा आणि इतर किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यातील सर्वात खोलवर जखम पाठीच्या कण्याजवळ झाली होती. लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून सैफच्या मणक्यातील अडीच इंच चाकूचा तुकडा काढला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू करत त्याच दिवशी तीन संशयितांना अटक केली. पोलिसांचे एक पथकही सैफच्या घरी पोहोचले आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पोलिसांनी घटनेच्या दिवशी (१६ जानेवारी) एका आरोपीला पकडले होते, तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पूर्ण सतर्कतेने सुरू आहे.
Mumbai, Maharashtra: A CCTV footage of a suspect in the Actor Saif Ali Khan case from January 12 in Versova has been found, but no footage is available from his house pic.twitter.com/aSWSNNO3Sz
— IANS (@ians_india) January 18, 2025
घटनेच्या काही तासांनंतर हल्लेखोराचा फोटो समोर आला असून तो सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसत आहे. पकडले जाऊ नये म्हणून तो आपला वेश बदलताना दिसत होता. एवढेच नाही तर सैफवर हल्ला करण्याच्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारीला त्या हल्लेखोराने वांद्रा पोलिस ठाण्याच्या आजुबाजुला बराचवेळ फिरत असल्याचेही दिसले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दादर येथील कबुतरखाना परिसरात भेट देऊन ‘इकरा’ नावाच्या मोबाईल शॉपीतील सीसीटीव्ही फुटेजही गोळा केले. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर १६ जानेवारीची ही गोष्ट आहे, ज्यामध्ये संशयित एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसत आहे. हे फुटेज रेल्वे स्थानकाचे आहे.
Mumbai, Maharashtra: Officers from the Crime Branch visited the Kabutarkhana area in Dadar and collected CCTV footage from a mobile shop named “Iqra” from where he purchased headphones after attacking actor Saif Ali Khan pic.twitter.com/ILxBjsD7eZ
— IANS (@ians_india) January 18, 2025
भूमी पेडणेकर- अर्जुन कपूरच्या ‘मेरे हसबंड की बिवी’च्या सेटवर मोठी दुर्घटना; कलाकारांची तब्येत कशी ?
या प्रकरणी करीना कपूर खाननेही पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अभिनेत्रीच्या घरी पोहोचून तिची जबानी घेतली. करीनाने पोलिसांना सांगितले की, संशयित अतिशय आक्रमक होता. त्याने सैफवर अनेकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो जहांगीरच्या खोलीत शिरला होता. मध्येच सैफ आल्याने हल्लेखोर जेहपर्यंत पोहोचू शकला नाही. हल्लेखोर जेहवर हल्ला करणार असे मला वाटले होते. हल्ला झाला तेव्हा लहान मुले आणि महिलांना बाराव्या मजल्यावर पाठवण्यात आले. त्याने घरातून कोणतीही चोरी केली नाही. पोलिस सैफवर हल्ला करणाऱ्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा हाच संशयित हल्लेखोर असावा, असा अंदाज पोलिसांना आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे २ वाजून ३३ मिनिटांनी संशयित सीसीटीव्हीमध्ये दिसला. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली येत असताना त्याने तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि लाल रंगाचा स्कार्फ घातला होता.