'कल्याणची चुलबूली'साठी खास पोस्ट, ‘मंगला’ चित्रपटात केलेल्या अभिनयाचं कौतुक; थिएटर आर्टिस्टची शिवालीसाठी स्पेशल पोस्ट
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोच्या माध्यमातून ‘कल्याणची चुलबूली’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली शिवाली परब सध्या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टेलिव्हिजन शो मधून महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झालेली शिवाली ‘मंगला’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकताच, १७ जानेवारीला ‘मंगला’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ चित्रपटात शिवालीसह अलका कुबल, शशांक शेंडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटातील शिवालीच्या अभिनयाचे कौतुक सेलिब्रिटींसह अनेक समीक्षकांनीही केले आहे. अशातच तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारानेही तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
भूमी पेडणेकर- अर्जुन कपूरच्या ‘मेरे हसबंड की बिवी’च्या सेटवर मोठी दुर्घटना; कलाकारांची तब्येत कशी ?
थिएटर आर्टिस्ट नील राजुरीकर याने शिवाली परबसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. शिवाली परबसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या अभिनेत्याने लिहिले की, “आजची ही खास पोस्ट आपल्या सगळ्याची लाडकी शिवाली अवली कोहली साठी… I know तिचं नाव Shivali Parab आहे… पण शिवाली अवली कोहली हे नाव घेण्याचं एक खास कारण आहे ते असं की… तिचं नाव शिवाली… आणि हास्यजत्रेमध्ये ती काय अवलीगिरी करुन सगळ्यांना किती हसवते ते तर तुम्हाला माहीतच आहे… पण “मंगला” ह्या चित्रपटामध्ये तिने फ्रंटफूट वर येऊन “कोहली” सारखी जी काही बॅटिंग केली आहे, त्याला तोड नाही… लाजवाब… शिवाली Sorry हा थोडा blur photo टाकतोय… आपले खूप खूप छान छान फोटोस आहेत माझ्याकडे but this one was icebreaker on the set… म्हणून हा माझ्यासाठी खास आहे… कारण काही set वर गेल्यावर अर्ध्या हळदीने पिवळे झालेले नट “इतर” कलाकारांना खूप वाईट वागणूक देतात पण तू, शशांक सर, अलका मॅम यांच्यासारखे कलाकार मात्र त्याच हळदीने आमच्या सारख्या कलाकारांना heal करतात आणि त्यामुळे आम्ही चांगलं परफॉम करू शकलो… Thank u once again…. आज आपला चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि नक्कीच ह्या वर्षीचे सगळे पुरस्कार मिळवशील अशी खात्री आहे… पुन्हा एकदा thank you… For treating me so generously… अभिनंदन team mangala”
शिवाली परबचा कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबरोबर इतर काम लीलया सांभाळत आहे. आता तिने मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवलं आहे. प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली नाट्य क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळत आहेत.