भूमी पेडणेकर- अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी'च्या सेटवर मोठी दुर्घटना; कलाकारांची तब्येत कशी ?
2025 मध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींचे चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहेत. लवकरच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकरचाही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या अपकमिंग चित्रपटाचं नाव ‘मेरे हसबंड की बिवी’ असं आहे. या चित्रपटाबद्दल आता महत्वाची बातमी समोर आली आहे. ‘मेरे हसबंड की बिवी’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकरचा मोठा अपघात झाला आहे. सेटवर अचानक छत कोसळल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणाला गंभीर दुखापत झाली नाहीये.
Azaad Day 1 Collection: राशा-अमनचा डेब्यू ठरला फ्लॉप, जाणून घ्या ‘आझाद’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन!
चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सेटवर अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंग आणि चित्रपटाचे दिग्दर्शक मुदस्सर अजीज उपस्थित होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही सेलिब्रिटीला गंभीर दुखापत झाली नाहीये. मुंबईतल्या रॉयल पाम्स इंपेरिअल पॅलेसमध्ये ‘मेरे हसबंड की बिवी’ चित्रपटाची शूटिंग सुरु होती. शुटिंगवेळी सेटवरील अचानक छत कोसळलं. शूटिंगदरम्यान मोठा आवाज झाल्यामुळे सेटवर सर्वांचीच धावपळ झाली. ऐन शुटिंग दरम्यानच छत कोसळल्यामुळे अर्जुन, भूमी, जॅकी आणि दिग्दर्शक मुदस्सर यांना किरकोळ जखम झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक दिवसांपासून मोठ्या आवाजात इथे शूटिंग होत असल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं बोललं जातंय.
ई- टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन कपूर, दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्यासह एकूण सहा लोकांना दुखापत झाली आहे. असे सांगण्यात येते की, छत कोसळल्याची दुर्घटना घडली तेव्हा अर्जुन आणि भूमी चित्रपटाच्या गाण्याचे शूट करत होते. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे अशोक दुबे यांनी सांगितले की, “आवाजामुळे कंपन झाल्याने सेट हादरायला लागला. त्यामुळे आणखी काही भाग पडू लागला. या अपघातात मी स्वतःही जखमी झालो आहे. माझ्या डोक्याला आणि कोपराला दुखापत झाले आहे.” छत कोसळल्याच्या दुर्घटनेत इतर क्रू मेंबर्सही जखमी झाल्याची माहिती अशोक दुबे यांनी दिली. डीओपी मनू आनंद यांचा अंगठा फ्रॅक्चर झाला, तर कॅमेरा अटेंडंटला पाठीच्या कण्याला दुखापत झाली. मात्र, त्यांनी देवाचे आभार मानले आणि कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे सांगितले. कोरिओग्राफर विजय गांगुली यांनी सांगितले की, “पहिल्या दिवशी गाण्याचे शूटिंग चांगले झाले पण दुसऱ्या दिवशी अपघात झाल्यामुळे गोष्टी बिघडल्या.”