(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात घेऊन गेलेल्या ऑटोरिक्षा चालक भजन सिंग राणा यांची मुंबई पोलिसांनी शनिवारी चौकशी केली. सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये एका हल्लेखोराने चाकूने हल्ला केला होता. गुरुवारी सकाळी एका महिलेने आणि काही इतरांनी सतगुरु दर्शन इमारतीजवळ ऑटो चालक राणाला अडवल्यानंतर राणाने अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात घेऊन गेला. तसेच आता ऑटो चालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. याबाबत त्याने करीना कपूरने अद्याप त्याच्याशी संपर्क साधलेला नाही असे सांगितले आहे.
भूमी पेडणेकर- अर्जुन कपूरच्या ‘मेरे हसबंड की बिवी’च्या सेटवर मोठी दुर्घटना; कलाकारांची तब्येत कशी ?
चालक चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला होता
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत चौकशीसाठी भजन सिंग यांना मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान, भजन सिंग यांनी सांगितले की त्यांनी सैफ अली खानला वेळेवर रुग्णालयात नेले होते, परंतु आतापर्यंत करीना कपूर किंवा अभिनेत्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या प्रकरणात त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. आणि त्याचे आभारही मानले नाही आहे.
#WATCH | Mumbai: Bhajan Singh, the auto-rickshaw driver who took Actor Saif Ali Khan to Lilavati Hospital, says “I was called there (Bandra Police Station) for questioning…I did not think about money that night…I have not been contacted by Kareena Kapoor or anyone else so… pic.twitter.com/pXHPsSkOp2
— ANI (@ANI) January 18, 2025
ऑटो चालकाचे निवेदन
चौकशी केल्यानंतर, ऑटो चालक म्हणाला, ‘मला चौकशीसाठी वांद्रे पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले होते. त्या रात्री मी पैशांचा विचार केला नाही. घटनेनंतर सात ते आठ मिनिटांत अभिनेत्याला रुग्णालयात सोडण्यात आले आणि त्याच्याकडून भाडे आकारण्यात आले नाही. करीना कपूर किंवा इतर कोणीही अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही. माझे त्याच्याशी काहीही संभाषण झालेले नाही.’ असे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले आहे.
जखमी व्यक्ती सैफ आहे हे ऑटो चालकाला माहित नव्हते.
गुरुवारी रक्ताने माखलेला कुर्ता घालून त्यांच्या ऑटोमध्ये चढलेला प्रवासी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आहे हे त्यांना माहिती नव्हते, असे राणा यांनी आधी म्हटले होते. ऑटोचालक म्हणाला होता, ‘त्या व्यक्तीचा पांढरा कुर्ता रक्ताने माखला होता तो ऑटोत चढला. मी पाहिले की त्याच्या मानेवर आणि पाठीवर जखमा होत्या, पण त्याच्या हातावर कोणतीही जखम नव्हती. जेव्हा आम्ही हॉस्पिटलच्या गेटजवळ पोहोचलो तेव्हा त्याने गार्डला स्ट्रेचर आणायला सांगितले आणि तो सैफ अली खान असल्याचे सांगितले.’ तेव्हा ऑटो चालकला समजले की हा अभिनेता सैफ अली खान आहे.