फोटो सौजन्य - सोशल मीडिया
इब्राहिम खान आणि पलक तिवारी : सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची दोन मुलं आहे, बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि त्यांचा मुलगा इब्राहिम खान. अभिनेत्रीने केदारनाथ सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते आणि त्या सिनेमामधून तिला प्रसिद्धी मिळाली होती. परंतु सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान मोठ्या पडद्यावर दिसला नाही. लवकर तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे असे अनेक वृत्त समोर आले होते. इब्राहिम हा बऱ्याचदा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी अभिनेत्री पलक तिवारीसोबत बऱ्याचदा स्पॉट झाला आहे. त्यामुळे बऱ्याचदा नेटकऱ्यांनी त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न केले आहेत.
आता इब्राहिम खानचे वडील म्हणजेच अभिनेता सैफ अली खानने त्याच्या नात्याबद्दल सांगितले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान इंडिया टुडेशी बोलताना, जेव्हा त्याला विचारले गेले की इब्राहिम किंवा सारा अली खान कधी आपल्याकडून नातेसंबंधांचा सल्ला घेतात का, तेव्हा अभिनेत्याने आपल्या मुलाबद्दल उत्तर दिले, ते म्हणाले, “हो, त्याला माझ्याकडून हे जाणून घेत असतात की एखाद्याने वयापर्यंत नातेसंबंध किती गंभीरपणे घ्यावेत. मी आमच्या संभाषणाबद्दल अधिक काही बोलले तर ते पूर्णपणे चुकीचे होईल. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल देखील बोलतो. मला सांगतो, तो विचारतो की आपण अनेकदा बाहेर जेवायला जाऊ का?
अभिनेता सैफ अली खान देवारा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगु, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा चित्रपट प्रेमींना पाहायला मिळणार आहे. या सिनेमामध्ये साऊथ चित्रपटामधील सुपरस्टार जुनियर NTR सुद्धा आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणार असा अंदाज वर्तवला जात आहे.