बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच शेतकरी (Farmer) झाली आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेलच? मग यामागचं कारण देखील जाणून घ्या. सुहानाने अलिबागच्या (Alibaug) थल गावात शेतजमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत 12 कोटी 91 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे जमीन खरेदी करताना तिने कागदावर स्व:तला शेतकरी असल्याचे दाखवले आहे.
[read_also content=”अतिउत्साहीपण नडला! दोन कोटी रुपये देऊन पाच जण गेले मरणाच्या दारात, पाकिस्तानी अब्जाधीशासह टायटॅनिकच्या बळीच्या वंशजाचाही समावेश https://www.navarashtra.com/india/fiive-passengers-died-who-went-to-see-titanic-ship-by-ocean-gate-submarine-nrps-421466.html”]
सुहाना खानने अलिबागच्या थल गावात ही जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या दीड एकर जागेवर 2218 चौरस फूट बांधकामही करण्यात आले आहे. जमीन खरेदीचा व्यवहार 1 जून रोजी झाला आणि त्यासाठी सुहाना खानने 77 लाख 46 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. सुहाना खानने ही जमीन तीन बहिणींकडून (अंजली, रेखा आणि प्रिया) विकत घेतली आहे. या तिन्ही बहिणींना त्यांच्या आई-वडिलांकडून ही जमीन वारसाहक्काने मिळाली होती.
सुहानने शेतकरी असा केला उल्लेख
इंडेक्सटॅप डॉट कॉमने जारी केलेल्या आकडेवारी खरेदीच्या वेळी कागदपत्रांमध्ये सुहाना खानला शेतकरी (शेतकरी) दाखवण्यात आले आहे. सुहाना खान 23 वर्षांची असून तिने वडिलांप्रमाणेच सिनेविश्वात प्रवेश केला आहे. तिचा पहिला चित्रपट द आर्चीज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल, ज्याचे दिग्दर्शन स्टार दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी केले आहे. या चित्रपटात सुहाना खानसोबत अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य आणि श्रीदेवीची मुलगी खुशी देखील दिसणार आहे.
अलिबाग शहरापासून 12 मिनिटांच्या अंतरावर आणि मांडवा जेट्टीपासून 31 मिनिटांच्या अंतरावर थळ गाव आहे. या थळ गावात शाहरुखची मालमत्ता आहे. या ठिकाणी स्विमिंग पूलपासून ते हेलिपॅडपर्यंत सुविधा आहेत. शाहरुखने त्याचा 52 वा वाढदिवस येथील पॅाश बंगल्यावर काही सर्व बॉलिवूड स्टार्स सोबत साजरा केला होता.