गेल्या 2-4 दिवसापासून कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डबाबात बरीच चर्चा सुरू आहे. कोविशिल्डमुळे दुष्पपरिणाम होऊ शकतात हे कंपनीने मान्य केल्यानंतर आता लसीमुळे होणारे दुष्पपरिणाम हा विषया नव्याने चर्चीला जात आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांनी प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्याचं सांगितल आहे. आता या चर्चेदरम्यान अभिनेता श्रेयस तळपदेची एक मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय की, तो म्हणतो की त्याला आलेला हृदयविकाराचा झटका हा कोविड-19 लसीशी संबंधित आहे.
[read_also content=”अभिनेता राकेश बेदीची पत्नी सायबर फसवणुकीला पडली बळी, एक फोन अन् लाखोंची फसवणूक! https://www.navarashtra.com/movies/actor-rakesh-bedi-wife-aradhana-bedi-lost-her-money-by-cyber-froud-nrps-529800.html”]
अभिनेता श्रेयस तळपदेला मागच्या वर्षी चित्रपटाच्या शुटींग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानतंरत्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता तो पूर्णपणे बरा आहे. आता एका ताज्या मुलाखतीत श्रेयस तळपदेने त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला की कोविड-19 लसीचा त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याशी काहीही संबंध नाही हे तो नाकारू शकत नाही. तो म्हणाला की, मी महिन्यातून फक्त एकदाच दारु पितो. तंबाखू घेत नाही. होय, माझी कोलेस्टेरॉलची पातळी थोडी जास्त होती. पण मला सांगण्यात आले की आज हे सामान्य आहे. मी त्यासाठी औषधे घेत होतो आणि ते कमी झाले होते. अभिनेता पुढे म्हणाला – मला मधुमेह नाही, मला रक्तदाबाचा त्रास नाही, मग हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय असू शकते? एवढी काळजी घेतल्यानंतरही असे होऊ शकते, तर यामागचे कारण काहीतरी वेगळे आहे. मी हा सिद्धांत नाकारणार नाही.
पुढे बोलताना श्रेयस म्हणाला की, COVID-19 लसीनंतर मला थोडा थकवा जाणवू लागला. यात काही तथ्य आहे आणि ते आपण नाकारू शकत नाही. हे कोविड किंवा लसीमुळे असू शकते.
श्रेयस म्हणाला की आपण एका कंपनीवर विश्वास ठेवून लस घेतली. पण याबाबत अधिक संशोधन व्हायला हवं. कोरोनापुर्वी मी अशा घटना ऐकल्या नव्हत्या. मला हे जाणून घ्यायचे आहे की लसीने आपल्या शरीरावर काय परिणाम केला आहे. मला खात्री नाही की हे कोविड किंवा लसीमुळे आहे. माझ्याकडे कोणताही ठोस पुरावा असल्याशिवाय काहीही बोलणे व्यर्थ ठरेल. पण मला हे जाणून घ्यायचे आहे की या लसीचा आपल्या शरीरावर कसा परिणाम झाला आहे.